वेंगुर्ला उपजिल्हा रूग्णालय समस्यांच्या गर्तेत; सर्व प्रश्न मार्गी लावणार-वालावलकर

वेंगुर्ला उपजिल्हा रूग्णालयाच्या विविध समस्यां बाबत उपजिल्हा रूग्णालयाला भेट देऊन येथील डॉ.पवार व परिचारिका इंचार्ज डिसोजा यांच्याकडून समस्या जाणून घेतल्यानंतर याबाबत शिवसेना तालुका कार्यालयात बैठक धेण्यात आली. यावेळी जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, तालुका संघटक बाळा दळवी, शहर प्रमुख उमेश येरम, प्रवक्ते सुशिल चमणकर, मच्छिमार सेल तालुकाध्यक्ष गणपत केळुसकर, युवासेना शहर प्रमुख संतोष परब, उपतालुका प्रमुख देवा कांबळी, प्रकाश मोटे, शिवाजी पडवळ, परेश मुळीक, प्रशांत शिरोडकर, राजू परब आदी उपस्थित होते.

   वेंगुर्ला ग्रामीण रूग्णालयाचे ५० खाटांचे उपजिल्हा रूग्णालय होऊन सुद्धा अद्यापपर्यंत महाकोष प्रणालीतील सेवार्थमध्ये समावेश न झाल्याने गेले ६ महिने याठिकाणचे डॉक्टर्स व कर्मचारी यांचा पगार झाला नाही. तसेच रूग्णालयात अनेक सुविधांची कमतरता असल्याची माहिती मिळताच शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या सूचनेनुसार वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या पदाधिका­यांनी २४ जुलै रोजी उपजिल्हा रूग्णालयाला भेट देऊन समस्या जाणून घेतल्या. या रुग्णालयात महात्मा फुले योजना बंद आहे. सर्जन नाही, भूलतज्ज्ञ नाही, प्रसुती दरम्यान ऑपरेशन होत नाही, हेड क्लार्क नाही, औषध अधिकारी नाही अशा अनेक समस्या असल्याच्या दिसून आलया. दरम्यान, मंत्री केसरकर यांच्या नेतृत्वाखाली लवकरात लवकर आरोग्यमंत्री यांची भेट घेऊन उपजिल्हा रूग्णालयाचे सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याचे शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Close Menu