राजन तेली यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ल्यात विविध उपक्रम संपन्न

सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पडझड होऊन गोरगरीब जनतेचे नुकसान झाले असल्याने भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी राजन तेली  यांचा वाढदिवस कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित न करता विविध सेवा उपक्रम आयोजित करुन सेवादिनसाजरा करण्यात आला. यामध्ये सध्याच्या अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत करण्यात आली. यात सुहास गणपत सावंत (वरचीवाडी), विजय पारकर (परबवाडा), बाळकृष्ण कर्णेकर (आरवली), संदिप मोहन परब (शिरोडा) यांचा समावेश आहे. तसेच वेंगुर्ला शहरातील रामेश्वर मंदिर, सातेरी मंदिर, हनुमान मंदिर, कॅम्प स्वामी समर्थ येथील फुलविक्रेत्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

       यावेळी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, जिल्हा कार्यकारिणी सदस्य वसंत तांडेल, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, बाबली वायंगणकर, पपू परब, साईप्रसाद नाईक, मनवेल फर्नांडीस, प्रकाश रेगे, पुंडलिक हळदणकर, शरद मेस्त्री, राजेश कांबळी, संतोष सावंत, प्रणव वायंगणकर, प्रितम सावंत, रवी शिरसाठ, शेखर काणेकर, अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, वृंदा गवंडळकर, वृंदा मोर्डेकर, रामेश्वर देवस्थानचे रविद्र परब, दाजी परब, दीपक नाईक, पालकरवाडी सरपंच बंड्या पाटील, वेतोरे सोसायटी चेअरमन विजय नाईक यांच्या सह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu