व्हॉलीबॉल स्पर्धेत बोथम वॉरियर्स विजेता

शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला शहर शिवसेनेतर्फे आयोजित केलेल्या खुल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत अंतिम सामन्यात रत्नागिरीच्या टी.सी.सी. कुचांबे या संघावर मात करीत वेंगुर्ल्याच्या बोथम वारीयर्स संघाने प्रथम क्रमांकाच्या १० हजार रूपयांचे बक्षिस व कायम स्वरूपी चषकाचा मानकरी ठरला. तर रत्नागिरीचा टी.सी.सी. कुचांबे संघ उपविजेता ठरला.

      कॅम्प येथील वेंगुर्ला हायस्कुल नजिकच्या मैदानावर आयोजित केलेल्या खुल्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते व शिवसेना तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, शहर प्रमुख उमेश येरम, जिल्हा संघटक सुनिल डुबळे, तालुका संघटक बाळा दळवी, महिला आघाडीच्या अॅड.श्रध्दा बावीस्कर, शबाना शेख यांच्या उपस्थितीत झाले. या स्पर्धेत २० निमंत्रीत संघांनी सहभाग घेतला होता.

      या स्पर्धेत मालिकावीर संकेत, बेस्ट लेटर हर्षद्, बेस्टलिबेरो साहिलकुमार तर बेस्ट अँटॅकर साहिल साटविलकर हे ठरले. यांनाही चषक व पारितोषिक देवून गौरविण्यात आले. स्पर्धेचे बक्षिस वितरण शिवसेनेच्या वेंगुर्ला महिला आघाडीच्या प्रमुख अॅड. श्रद्धा बावीस्कर व अल्पसंख्यांक महिला सेलच्या शहर प्रमुख शबाना शेख यांच्या हस्ते व व्हॉलीबॉल कोल्हापूर विभागीय असोसिएशनचे सचिव तथा उभादांडा सरपंच निलेश चमणकर, वेंगुर्ला हायस्कुलचे मुख्याध्यापक पी.डी.कांबळे, राष्ट्रीय खेळाडू राधाकृष्ण पेडणेकर, सॅमसन फर्नांडीस, प्रा.हेमंत गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

  स्पर्धेसाठी पंच म्हणून ओंकार पोयरेकर व विजय शिंगाडे यांनी काम पाहिले. सदर स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जय मानसीश्वर व्हॉलीबॉल संघाच्या सदस्यांनी परीश्रम घेतले.

Leave a Reply

Close Menu