मंडळाद्वारे सांस्कृतिक वारसा टिकविण्याचे काम

वेंगुर्ला शहरातील हॉस्पिटल नाका कला-क्रिडा मंडळाच्यावतीने सलग तिस­या वर्षी दीपावली शो टाईमचे आयोजन करून दांडिया नृत्य, रेकॉर्ड डान्स आणि दशावतारी नाट्यप्रयोग संपन्न झाला. उद्घाटन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते झाले. सांस्कृतिक वारसा टिकविण्याचे मंडळ करीत असल्याबद्दल श्री.देसाई यांनी गौरवोद्गार काढले. यावेळी भाजपाचे बाबली वायंगणकर, मंडळाचे अध्यक्ष अॅड. मनिष सातार्डेकर, उपाध्यक्ष महेंद्र गावडे, दिनेश तानावडे, विनायक शिरवणकर, शाम कौलगेकर, राजू वजराठकर, रामचंद्र सावंत, ज्ञानेश्वर कळेकर, राहूल वेंगुर्लेकर, जयंत सावंत, रूपेश सावंत, प्रफुल्ल सावंत, करण निरावडेकर, सौरभ भोसले, मनिष कळेकर, कौस्तुभ गवस, पुरूषोत्तम मडकईकर, मकरंद होळकर, सिद्धेश मांजरेकर, निखिल शिरोडकर, सचिन मांजरेकर यांसह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu