पार्किगबाबत मुख्याधिका-­यांचे आश्वासन

वेंगुर्ला शहरांमध्ये रविवारी आठवडा बाजार भरत असतो. न.प.च्या पार्किग जागेत त्या दिवशी दुकाने लावल्याने गाड्या घेऊन लोक पार्किग ठिकाणी जाऊ शकत नाही. त्यामुळे लोकांना नाईलाजास्तव रस्त्यावर गाड्या लावाव्या लागतात. पार्किगची जागा मोकळी ठेऊन त्या ठिकाणी जाण्यायेण्यासाठी एक रस्ता मोकळा ठेवावा, जेणेकरून पार्किग व्यवस्था सुलभ होईल अशा आशयाचे निवेदन शिवसेनेचे वेंगुर्ला शहर प्रमुख उमेश येरम यांच्यासह व्यापारी संदिप गावडे, विजय गावडे, जयेश गावडे, गजा शारबिद्रे, जीजी गावडे, सुरेश गवळी, सुधीर वाडकर आदींनी मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांना दिले. यावर मच्छीमार्केटच्या मुख्य गेटकडून पार्किग भागात जाण्याची व्यवस्था व पार्किगच्या ठिकाणी दुकाने न लावण्याबाबतची कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी उपस्थितांना दिले.

Leave a Reply

Close Menu