वेंगुर्ल्याच्या चतुःसिमेवर रोटरी व्हिलचे अनावरण

जगभरात रोटरी क्लबच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी विविध उपक्रम राबवून जनसेवा सेवा देण्यास कार्यरत असलेल्या रोटरी क्लबचे व्हिल या चिन्हाचे प्रथमच वेंगुर्ला शहरातील चतुःसिमेवर अनावरण रोटरीचे प्रांतपाल नासिरभाई बोरसदवाला यांच्या हस्ते झाले.

      यावेळी रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनने रोटरी क्लबची जनसेवा या भागात उपलब्ध आहे हे दर्शविणासाठी वेंगुर्ला शहराच्या सीमांवर उभारलेल्या रोटरी व्हीलच्या अनावरण प्रसंगी रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासिरभाई बोरसादवाला, सचिन वालावलकर, प्रेसिडेंट शंकर वजराटकर, वासुकी सानजी, प्रसन्ना देशिंगकर, राहुल कुलकर्णी, गौरव शहा, ऋषिकेश खोत, दिलीप गिरप, योगेश नाईक, मानसिंग पानसकर, दादासाहेब कडोलकर, दिलीप शेवाळे, डॉ.सतिश इरकल, इव्हेंट चेअरमन राजेश घाटवळ, प्रा.वसंत पाटोळे, दादा साळगावकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu