उपसचिव तळवडेकर यांची सदिच्छा भेट

मुंबई विद्यापिठाच्या रिसर्च, अॅडमिनिस्ट्रेशन आणि प्रमोशन विभागाचे उपसचिव निळकंठ तळवडेकर यांनी २३ डिसेंबर रोजी मालवण येथील स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी महाविद्यालयाच्यावतीने प्राचार्य डॉ.शिवराम ठाकूर यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. श्री.तळवडेकर यांनी विद्यापिठाच्या कामाची व्याप्ती, थेसीस विभागाचे कार्य, पी.एच.डी करत असताना कागदपत्रांची काटेकोर पूर्तता, रिसर्च आणि इंक्युबेशनचे महत्त्व इत्यादी विषयी महाविद्यालयातील शिक्षक व प्रशासकीय कर्मचा-­यांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच प्राध्यापकांच्या संशोधन प्रबंध विषयक शंकांची उत्तरे दिली. तसेच प्रा.कैलास राबते यांना राजर्षी शाहू पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांना श्री. तळवडेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्राचार्य डॉ. ठाकूर यांनी तळवडेकर यांच्या विविध विभागातील आणि थेसिस सेक्शनमधील अनुभवाचा व कार्याचा परिचय करून दिला. यावेळी डॉ.आर.एन.काटकर, प्रा.कैलास राबते, डॉ.सुमेधा नाईक यांनी आपली मनोगते व्यक्त केली. डॉ. उज्ज्वला सामंत यांनी आभार मानले.

Leave a Reply

Close Menu