मधुसूदन कालेलकर यांच्या स्मृतींना उजाळा

एखाद्या शहराची समृद्धी ठरवायची तर त्या शहरात उंच उंच इमारती, अद्ययावत बंगले, उंची इम्पोर्टेड गाड्या, शॉपिंग मॉल या सर्वांना भौतिक प्रगती म्हणता येईल. भौतिक प्रगती येते आणि जातेही. परंतु, खरे समृद्ध शहर त्यालाच म्हणता येईल की ज्यामध्ये चांगल्या शाळा, वाचनालय, सांस्कृतिक केंद्र, कलादालन अशा गोष्टी असतील, ज्या एका पिढीकडून दुस­या पिढीकडे हस्तांतरित होतील. वेंगुर्ला अशाच अर्थाने एक समृद्ध शहर म्हणता येईल. वेंगुर्ल्यात जन्म झालेल्या नाटककार मधुसूदन कालेलकर यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात याकरिता वेंगुर्ला नगरपरिषदेने त्यांच्या नावाने उभारलेली देखणी वास्तू शहराच्या लौकिकात भर घालत आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी तथा पत्रकार सुधीर सेवेकर यांनी केले.

     नाटककार मधुसूदन कालेलकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त १७ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात श्री. सेवेकर बोलत होते. यावेळी ६२वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे परिक्षक नरेंद्र आमले, अॅड.डॉ.प्रतिभा तेटू-नागपूरे, सुधीर सेवेकर, माजी नगराध्यक्ष राजन गिरप, सुनील नांदोस्कर, राज्य नाट्य स्पर्धेचे समन्वयक प्रशांत आपटे, ‘किरात‘च्या सीमा मराठे, नंदू जुवेकर, ‘माझा वेंगुर्ला‘चे राजन गावडे, खेमराज कुबल, अमोल खानोलकर, संदीप परब, शशांक मराठे, यासिर मकानदार, कपिल पोकळे, अमृत काणेकर, भानू मांजरेकर, यश मांजरेकर, भाई वायंगणकर, पपू परब, सायमन आल्मेडा यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

    १२ ते १६ डिसेंबर दरम्यान कालेलकर बहुउद्देशीय सभागृहामध्ये राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी प्रेक्षकांच्या हाऊसफुल्ल प्रतिसादात पार पडली. दुस­या  दिवशी मधुसूदन कालेलकरांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून ‘माझा वेंगुर्ला‘ टीमने मधुसूदन कालेलकरांना मानवंदना दिली. सीमा मराठे यांनी मधुसूदन कालेलकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

 

Leave a Reply

Close Menu