तिसरे समाज साहित्य विचार संमेलन संपन्न

  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘समाज साहित्य प्रतिष्ठान‘ संस्थेचे ‘तिसरे समाज साहित्य विचार संमेलन‘ दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयांच्या सभागृहात पार पडले. संमेलनात मुंबई, नवी मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागातून आलेले रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात अभिनेते, कवी किशोर कदम, विलास कोळपे, सुबोध मोरे, प्रकाश भातांब्रेकर, व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर, दीपक राज्याध्यक्ष, कवी डॉ.श्रीधर पवार, अंधश्रद्धा निर्मूलन समिती पत्रिकेचे संपादक देशपांडे, ज्येष्ठ अभिनेते अनिल गवस, हिंदी अनुवादक रमेश यादव, गायिका सुनंदा दैंडककर, संध्या नरे पवार, ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे, ज्येष्ठ पत्रकार नितीन चव्हाण, सूर्यकांत मालुसरे, ज्येष्ठ पत्रकार अक्षर प्रकाशनाचे राजन परब, कार्यवाह वैभव साटम यांच्यासह चित्रपट नाटक संगीत, साहित्य,पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.  पुरस्कार वितरण समारंभात चंद्रकांत वानखडे यांना ‘इतिहासकार गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळूसकर पुरस्कार‘, कवी डॉ.अनिल धाकू कांबळी यांना ‘प्रकाश रामचंद्र रसाळ स्मृति भूमी काव्य पुरस्कार‘, बार्शच्या डॅा.ऐश्वर्या रेवडकर आणि जयदीप विघ्ने यांना ‘जयंत पवार कथा पुरस्कार‘, विजय जावळे यांना ‘काशीराम आत्माराम साटम स्मृति समाज साहित्य कादंबरी पुरस्कार‘, तसेच कुसुमाकर मासिकाचे संपादक श्याम पेंढारी आणि एकता कल्चरल अकादमीचे अध्यक्ष प्रकाश जाधव या दोघांना ‘ बालसन्मित्र‘कार ‘ पां.ना.मिसाळ ‘ सन्मान पुरस्कार देण्यात आले. संमेलनाच्या दुस­या सत्रात कवयित्री डॉ.सिसिलिया काव्हालो यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कविसंमेलनात अविनाश गायकवाड, वर्जेश सोलंकी, जिजा शिंदे, अंजली ढमाळ, महेश लीला पंडित, बालिका ज्ञानदेव, संगीता अरबूने, अंजली ढमाळ, रमेश सावंत, विजय सावंत, प्रियदर्शिनी पारकर, संतोष जोईल, रमेश सावंत यांनी कवितावाचन केले. या पसंगी सर्व कवी आणि कवयित्री यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

 

Leave a Reply

Close Menu