मराठी नाट्य स्पर्धेत ‘तथास्तु‘ प्रथम

६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत चिपळूण, मालवण व वेंगुर्ला केंद्रातून श्रीरंग, रत्नागिरी या संस्थेच्या ‘तथास्तू‘ या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच राधाकृष्ण कलामंच, रत्नागिरी या संस्थेच्या ‘वॅट नाईट‘ या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे चिपळूण, मालवण वेंगुर्ला केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे- स्वराध्या फाऊंडेशन, मालवण या संस्थेच्या ‘एक्सपायरी डेट‘ या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शनः प्राथम-भाग्येश खरे (तथास्तू), द्वितीय-चंद्रशेखर मुळये (वॅट नाईट), प्रकाश योजना प्रथम-श्याम चव्हाण (एक्सपायरी डेट), द्वितीय-साईपसाद शिर्सेकर (तथास्तू), नेपथ्य प्रथम-प्रशांत साखळकर (देंट नाईट), द्वितीय-रॉबीन लोपीस (कृष्णकिनारा), रंगभूषा प्रथम-उल्हेश खंदारे (कोमल गांधार), द्वितीय-हेमंत वर्दम (सावरबेट), उत्कृष्ट अभिनय-रौप्यपदक-गोपाळ जोशी (तथास्तू) व शुभदा टिकम (एक्सपायरी डेट), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे-रक्षिता पालव (वाटेला सोबत हवी), अन्विता कुलकर्णी (त्या तिघांची गोष्ट), मुक्ता शेंबेकर (देंट नाईट), सोनल शेवडे (तथास्तू), कांचन खानोलकर (कृष्णकिनारा), शुभम कुशे (परिघ), विवेक गोखले (लॉलीपॉप), प्रदिप होडावडेकर (कालचक्र), दीपक माणगांवकर (देंट नाईट), शरद सावंत (कृष्णकिनारा). २५ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र-चिपळूण, मामा वरेरकर नाट्यगृह-मालवण व नाटककार कालेलकर नाट्यगृह-वेंगुर्ला येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण २१ नाट्यप्रयोग सादर झाले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून नरेंद्र आमले, सुधीर सेवेकर आणि प्रतिभा नागपूरे यांनी काम पाहिले. सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रथम व द्वितीय आलेल्या नाटकाच्या संघाचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Close Menu