मागोवा २०२३…

२०२३ या वर्षात साप्ताहिक किरात दिवाळी अंकासह ५१ अंक प्रकाशित झाले. वेंगुर्ल्यातील लोकजीवन, रोजच्या जीवनात भेटणारी माणसे आणि त्यातून नकळत निर्माण झालेले गहिवर नाते ‘आठवणींच्या हिंदोळ्यातून‘ वाचकांच्या भेटीला आले. अनेकांच्या जीवनात काही माणसे पडद्यामागचे दृश्य होत असतात. ते फारसे प्रकाशझोतात नसले तरी त्यांच्या अस्तित्वाचा फार मोठा परिणाम आयुष्यावर होत असतो. त्यांच्या या आठवणी ‘शब्द सुमनांजली‘ या सदरातून व्यक्त झाल्या आहेत. बदलत्या जीवनशैलीत लहान कुटुंबात मुलांना वाढविताना ‘जडणघडण‘ या सदरातून अनुभव मांडणी असल्याने वाचकांना हे लेख आपलेच वाटतात.  विशेष मुलांसाठी पुण्यातील ‘प्रिझम फऊंडेशन‘ ही संस्था काम करते. या संस्थेमधील बेन्यू प्रशिक्षण विभागाच्या मुख्याध्यापक विद्या भागवत यांनी लिहिलेल्या विशेष मुलांच्या जिद्दीच्या कहाण्या ‘तुज पंख दिले देवाने‘ या सदरातून वाचकांच्या भेटीला आणल्या. ‘मनाचीये गुंती‘ या सदरातून मानसिक आजाराला तोंड देताना नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी याचे सुंदर लिखाण मीनाक्षी यांनी केले. ‘लोकल टु ग्लोबल‘ अशी ‘किरात‘ मधील लेखांची मांडणी वाचकांना अंतर्मुख करत असल्याच्या प्रतिक्रिया लेखक आणि आमच्यापर्यंत पोहोचविल्या. शिवाय वाचकांची मते, प्रतिक्रियांनाही ‘किरात‘मध्ये स्थान दिले जाते.

      आजकाल विविध वाहिन्या युट्युब यासारख्या माध्यमातून विविध भागातील खाद्यपदार्थ पुढेच खवय्यांपर्यंत पोहोचवितात. मात्र, संजय गोविद घोगळे यांनी वेंगुर्ल्याची ‘खाद्यभ्रमंती‘ या सदरामधून वेंगुर्ल्यात मिळणारे नाना विविध खाद्यपदार्थ, भोजन, त्यांचे ठिकाण, विक्रेते, भोजनालय, उपहारगृह यांचे संचालक, बल्लवाचार्य यांची थोडक्यात माहिती रंजक पद्धतीने मांडली आहे. समाजातील बदलत्या घडामोडींचा लेखाजोगा ‘प्रासंगिक‘ लिखाणामधून वाचकांना विस्तृतरित्या वाचायला मिळावे यासाठी ‘किरात‘ कायमच प्रयत्नशील असतो आणि यापुढेही राहील. ‘पत्रकार दिन‘, ‘महिला दिन‘, ‘गणपती विशेष‘, ‘दिवाळी अकं‘, ‘जत्रा विशेष‘ या अंकांमधून नवोदित हातांना प्राधान्य देताना त्यांच्या लिखाणातून अनके नाविन्यपूर्ण, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, कला या विषयावरील लेख किरात अंकातून घेता आले.

      ‘किरात‘ने सामाजिक भान राखताना जनजागृतीसाठी अनेक विषय हाताळले. भारतीय लोकशाही व्यवस्था अधिकाधिक बळकट होण्याच्या दृष्टीने आणि मतदारांमध्ये त्यांच्या अधिकार हक्कांविषयी जाणिव जागृती होणे यासाठी अशाप्रकारच्या चर्चा वारंवार होत राहणे अत्यावश्यकच असल्याने समर्पक प्रासंगिक लेख अभ्यासकांनी लिहिले. साप्ताहिक ‘किरातला‘ या प्रक्रियेत सहभागी होता आले याचा आनंद अधिक आहे. kiratonline.in या वेबसाईटमुळे ‘किरात‘ वाचकांपर्यंत स्थानिक वर्तमान पोहचविण्यासाठी बराच उपयोग झाला. तसेच व्हॉटसअॅपच्या माध्यमातूनही ‘किरातचा पीडीएफ‘ अंक आज सर्वदूर पोहचत आहे. किरातच्या ‘यू ट्यूबच्या‘ माध्यमातून शताब्दी कार्यक्रम तसेच आठवड्यातून प्रकाशित होणा­या साप्ताहिक मधील बातम्यांचा संक्षिप्त आढावा, मन संवाद- गुज अंतरीचे या मालिकेतून अनेकांच्या मुलाखती मधून प्रिट मीडिया सोबत काळाशी जुळवून घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न ‘किरात‘ करत आहे.

      किरात दिवाळी अंक २०२३ या अंकात ‘मै नही तो कोन भी म्हणत रहा‘ विश्वात पदार्पण करत आपली ओळख निर्माण करणारी कोकण कन्या सृष्टी तावडे, चित्रपटसृष्टीत सेट डिझायनर म्हणून नावारूपाला आलेली कणकवलीची पूर्वा पंडित, भुजबळ तीन दशकाहून अधिक काळ विशेष मुलांसाठी आपल्या योगदान देणा-या विद्या भागवत, स्वतः मूकबधिर असलेला प्रसाद जोशी यांचा थक्क करणारा ध्येयवेडा प्रवास मुलाखत विभागामधून उलगडला आहे. या चारही जणांचा समान सूत्र म्हणजे प्रत्येक व्यक्ती आपल्या ध्येयाप्रती प्रामाणिक आणि निवडलेल्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे. दक्षिण कोकणातील लोक सांस्कृतिक परंपरा हे सूत्र घेऊन अभ्यासक मान्यवरांनी लिहिलेले लेख वाचकांना आवडल्याचे अभिप्राय किरात टीमसाठी प्रेरणा देऊन गेले. सलग चौथ्या वर्षी पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक अरुण सावळेकर यांनी आयोजित केलेल्या खुल्या कथा लेखन स्पर्धेमुळे अनेक लिहित्या हातांना चालना मिळाली. या अंकासाठी दरवर्षीप्रमाणे लेखक, कवी, जाहिरातदार, वाचकांच्या सहकार्याने दर्जेदार साहित्यिक परंपरा अखंडित ठेवण्यास आम्हाला मदत झाली.

     नविन वर्षात ‘किरात‘नव्या संकल्पनांसोबत जुन्या-नव्या सदरांसह आपल्या भेटीला येईल. वाढत्या महागाईचा फटका प्रिटींग व्यवसायालाही बसत आहे. तरी शताब्दी वर्ष २०२२ पासून साप्ताहिक ‘किरात‘ ची वार्षिक वर्गणी दिवाळी अंकासहीत रुपये ३५० एवढी करण्यात आली. मात्र, ज्या सभासदांची २०२१ पर्यंत वर्गणी येणे बाकी आहे. त्यांनी ३०० रूपयांप्रमाणे वर्गणी जमा करावी. तसेच साधारण ७ ते ८ वर्षांची वर्गणी न भरलेल्या वर्गणीदारांना स्मरणपत्रे पाठविली आहेत. त्यातील काहींनी वर्गणी भरली आहे. परंतु, पत्रास कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अशा वर्गणीदारांचे अंक आम्ही नाईलाजाने बंद करीत आहोत. तरी सभासदांनी मागील वर्गणी बँकेत भरून सहकार्य करावे. अनेक सभासदांचे संफ क्रमांक उपलब्ध नसल्याने त्यांच्याशी संफ साधता येत नाही. त्यासाठी सर्वांनीच आपले संफ क्रमांक ‘किरात‘ कार्यालय अथवा ९६८९९०२३६७ या वॉटसअॅप नंबरवर कळवावेत. जेणेकरुन ‘किरात‘ मार्फत होणा­या उपक्रमांची माहिती वेळोवेळी प्रिंट, यूट्यूब सोबत फोन माध्यमातूनही मिळू शकेल. शतकोत्तर सेवा देताना ‘किरात‘ ला सहकार्य करणा­या ज्ञात-अज्ञात सर्वांचे मनःपूर्वक आभार!     ‘किरात‘ परिवारातर्फे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Leave a Reply

Close Menu