पालकमंत्र्यांनी साधला बंदिवानांशी संवाद

   जिल्हा कारागृह  येथे पालकमंत्री रविद्र चव्हाण यांनी ६ जानेवारी रोजी भेट देऊन कारागृहातील बंदिवानांना मिळणा­या जेवणाची, निवासाची तसेच उपहारगृहाची पाहणी केली. यावेळी माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार राजन तेली, प्रभाकर सावंत उपस्थित होते. बंदीवानांची नियमित आरोग्य तपासणी करावी, त्यांना सकस आहार देण्यात यावा अशा सूचना कारागृह प्रशासनास देत कारागृहाच्या समस्या सोडविणार असल्याचे त्यांनी सांगितले. कारागृह परिसरात बंदिवानांनी केलेल्या भाजीपाल्याच्या शेतीची पाहणी करीत त्यांच्याशी संवाद देखील साधला. 

        कारागृह अधिक्षक बी.एम.लटपटे यांनी पालकमंत्र्यांना कारागृहाबद्दल सविस्तर माहिती दिली. कारागृह परिसरात १ एकरावर भाजीपाल्याची सेंद्रीय  शेती करण्यात येते. बंदिवानांच्या आहारातदेखील याच भाजीपाल्याचा समावेश होत असल्याचे त्यांनी सांगितले. कारागृहास मंजूर झालेला शस्त्रसाठा ठेवण्याकरिता व कारागृह कर्मचारी यांच्याकरिता सुरक्षा रक्षक खोली, शस्त्रसाठा जतनासाठी शस्त्रगार व बंद्यांच्या भेटीला येणा­यांसाठी प्रतिक्षालय, कारागृह ते गरूड सर्कल ओरोस या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करावे, कारागृहाच्या तटबंदीच्या आतील व बाहेरील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करावे अशीही मागणी श्री.लटपटे यांनी पालकमंत्र्यांना केली.

 

Leave a Reply

Close Menu