सोनारमळी येथे विद्यार्थ्यांनी बांधला बंधारा

रायसाहेब डॉ.रा.धों.खानोलकर हायस्कूलमधील इयत्ता आठवी ते दहावीचे विद्यार्थी, सर्व कर्मचारी व पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी सतीश गावडे व भगवान गावडे यांच्या सहकार्याने मठ-सोनारमळी येथे मातीचा बंधारा बांधण्यात आला. या बंधा­यामुळे आईरवाडी, मोबारकरवाडी, गावठणवाडी तसेच आजूबाजूचा परिसरातील पाणीसाठा वाढणार असून शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. बंधारा बांधताना मुख्याध्यापक एस.ए.जाधव, राष्ट्रीय हरित सेनेच्या प्रमुख स्वप्नाली कांबळी, गणुराज गोसावी, नरेंद्र नाईक, दिगंबर मोबारकर, अनिकेत कांबळे, मयुर परब, समीक्षा बोवलेकर, रेणुका बोवलेकर, समीक्षा मेस्त्री, अक्षदा गावडे, दिगंबर सावंत, श्रावणी धुरी, पायल सावंत, भविका आईर, हसरी होडावडेकर, सोहम गावडे, सईश गडेकर, सिद्धी सावंत, कृतिका धुरी, सुषमा गावडे, द्वारकानाथ कोकरे, आर्यन पवार, चिन्मय मठकर आदींनी सहकार्य केले.

 

Leave a Reply

Close Menu