जिल्हा पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन उत्साहात

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन ओरोस येथे पत्रकार दिन व जिल्हास्तरीय पत्रकार पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री रविद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा पोलिस अधिक्षक सौरभ अग्रवाल, तहसिलदार अमोल पाठक, प्रमुख वक्ते लोकमतचे संपादक वसंत भोगले, जिल्हा पत्रकार संघाचे उमेश तोरसकर, देवयानी वरसकर, बाळ खडपकर, रमेश जोगळे, बंटी केनवडेकर, दाजी नाईक, दिपेश परब, गणेश जेठे, माधव कदम, महेश रावराणे, नंदकिशोर महाजन, संतोष वायंगणकर, महेश सरनाईक, संतोष राऊळ, संतोष सावंत, लखू खरवत आदी उपस्थित होते.

  पत्रकारांनी राजकीय व्यक्तींच्या टीकाटिप्पणीपेक्षा प्रत्येक नागरिकाला  रोजगार कसा मिळले यासाठी लिखाण करावे, असे आवाहन पालकमंत्री चव्हाण यांनी केले. सिंधुदुर्गनगरी येथे जांभेकर स्मारक व पत्रकार भवन उभे राहिले हीच खरी बाळशास्त्री यांना श्रद्धांजली असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले. आताची पिढी वृत्तपत्रापासून दूर जात आहे. त्यामुळे समाजप्रबोधन करणारी बातमी बातमीदाराने करावी असे मत वैभव नाईक यांनी व्यक्त केले. पर्यावरणाचा समतोल आणि संवर्धन होण्यासाठी लिखाण करून पोषक वातावरण तयार करावे असे वसंत भोसले म्हणाले.

  यावेळी चंद्रशेखर तांबट (कणकवली), श्रीधर साळुंखे (वैभववाडी), दत्तप्रसाद पेडणेकर (मालवण), नंदकुमार आयरे (ओरोस), गणपत डगी (दोडामार्ग), अवधूत पोईपकर (सावंतवाडी), प्रमोद म्हाडगुत (कुडाळ), प्रथमेश गुरव (वेंगुर्ला), दयानंद मांगले (देवगड) यांना पत्रकार पुरस्कार तर माधव कदम यांना विशेष जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Leave a Reply

Close Menu