वेताळ प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धस महाराष्ट्रातून प्रतिसाद

वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसच्या वतीने सलग दहाव्या वर्षी लिहित्या हाताना व्यासपीठ मिळावे म्हणून खुल्या आणि शालेय गटात निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दोन्ही स्पर्धेत सिंधुदुर्गासह अगदी मुंबई,पुणेसंभाजीनगरकोल्हापूर, गोवासातारापुणेनाशिकशिर्डीजळगावरत्नागिरीअहमदनगर आदी ठिकाणांहून स्पर्धक सहभागी झाले. शालेय गटासाठी  आमचे आदर्श कोणशिक्षक की सेलिब्रिटी‘ हा विषय होता. यात ८९ शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रथम- मंगल देवदास मुळीक (मळेवाड पंचक्रोशी हायस्कूल)द्वितीय- गायत्री लक्ष्मण वरगांवकर ( न्यू इंग्लिश स्कूलउभादांडा)तृतीय- प्रणव सखाराम घाडीखुल्या निबंध स्पर्धेसाठी दररोजचा दीड जीबी डेटाः बेरोजगारीची न होणारी जाणीव‘ हा आगळा-वेगळा विषय देण्यात आला होतायात एकूण ४५ स्पर्धकांनी सहभाग दर्शविला. प्रथम- विष्णू पांडुरंग दळवीद्वितीय-निता नितिन सावंततृतीय रामा वासुदेव पोळजी यांनी क्रमांक पटकाविले. निबंध स्पर्धचे परीक्षण प्रा.डॉ. पी.आर.गावडे यांनी केले.

Leave a Reply

Close Menu