न्यू इंग्लिश स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ

उभादांडा येथील न्यू इंग्लिश स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ ३० जानेवारी रोजी संपन्न झाला. आपले आईवडील तसेच गुरूवर्य यांच्याप्रती सदैव कृतज्ञतेचा भाव जपावा आणि स्वतःच्या जीवनात यश संपादन करावे असा संदेश ज्येष्ठ रांगोळीकार रमेश नरसुले यांनी दिला. ध्येय वेडे व्हा. यश तुमचेच आहे. ज्याचे ध्येय निश्चित आहे तोच जीवनात यशस्वी होतो असे निवृत्त गटशिक्षणाधिकारी रमेश पिगुळकर यांनी सांगितले. तर प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्वतःची प्रगती साधावी. भारताची आंतराळ मोहिमया विषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत अशी इच्छा सरपंच निलेश चमणकर यांनी व्यक्त केली.

    यावर्षी आदर्श विद्यार्थीनी म्हणून श्रुती शेवडे व आदर्श विद्यार्थी दिपेश वराडकर यांना गौरविण्यात आले. माजी विद्यार्थी संघाच्यावतीने सांस्कृतिक, कला क्षेत्रात योगदान देणा-या विद्यार्थ्यास स्व.प्रथमेश पार्सेकर स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यावर्षीचा हा पुरस्कार वीर गावडे याला माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अजित केरकर व संस्था कार्यकारिणीचे ज्येष्ठ संचालक राधाकृष्ण मांजरेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरीसाठी दिला जाणारा क्रीडावीर पुरस्कार शौर्य तारी तर क्रीडाबाला पुरस्कार योजना कुर्ले यांना सरपंच निलेश चमणकर यांच्या हस्ते देण्यात आला. आदर्श शिक्षक पुरस्काराचे यावर्षीचे मानकरी या विद्यालयाचे अध्यापक दिपक बोडेकर यांना रमेश नरसुले यांच्या हस्ते गौरविण्यात आले. शालेय पारितोषिक ठेव निधीतून दिली जाणारी पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

    निबंध, वक्तृत्व, दशावतारी नाट्य अशा विविध स्पर्धासाठी विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त मार्गदर्शन करणारे प्रा.वैभव खानोलकर यांचा रमेश नरसुले यांनी शाळा संस्था व पालकांमार्फत १ हजार रूपयांचे पारितोषिक देऊन गौरव केला. सरपंच चमणकर यांनी २ हजार ५००, रमेश पिगुळकर यांनी १००१, सुहास तांडेल यांनी ५००, अनिल भाईडकर यांनी १००० रूपयांचे देणगी मुख्याध्यापक उमेश वाळवेकर यांच्याकडे सुपूर्द केली.

    या कार्यक्रमाला संस्था कार्यकारिणी सदस्य निलेश मांजरेकर, सुजित चमणकर, माजी मुख्याध्यापक कांबळी, सेवानिवृत्त शिक्षक मधुकर कुबल, निवृत्त अध्यापिका उल्का वाळवेकर, श्रीधर शेवडे, भाभी पडवळ, भाऊ करंगुटकर, राजाराम नाईक, संस्थेचे माजी सेक्रेटरी श्रकृष्ण पेडणेकर, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष अनिल भाईडकर, सुहास तांडेल, सुनिल कांबळी, जयराम वराडकर, संदेश मोचेमाडकर, नितीन रेडकर, आत्माराम सावंत, पालक शिक्षक संघ सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    अहवाल वाचन वर्षा मोहिते यांनी, पारितोषिकांचे वाचन भिसे व अंधारी मॅडम यांनी, सूत्रसंचालन प्रा.वैभव खानोलकर यांनी तर आभार दिपक बोडेकर यांनी मानले. शाळेचे शिक्षकेत्तर कर्मचारी दिलीप गोठोसकर यांचेही सहकार्य लाभले.

Leave a Reply

Close Menu