वाढीव नुकसान भरपाई तातडीने देण्याची मागणी

शिरोडा-वेळागर येथे ग्लोबल स्टॅण्डर्ड हॉस्पीटॅलिटी युनिटचीस्थापना करण्यासाठी आणि प्रकल्प जलद गतीने कार्यान्वीत करण्यासाठीज्या खाजगी जमिन मालकांच्या जागांचा सर्व करण्यात आलेला आहे व जमिन संपादीत केलेली आहे. त्या जमिनीची वाढीव नुकसान भरपाई देण्याबाबत सर्व केल्यानंतर तीन टप्यात ६० कोटी रुपयांचे वितरण होण्याचे जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत ठरले होते. तसे आदेश शालेय शिक्षण मंत्री यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेले होते. मात्र अद्याप त्याची पुर्तता झालेली नाही. चालू फेब्रुवारी महात पहिल्या आठवड्यात पहिल्या टप्प्यातील रक्कमेचे वितरण सुरू करावेअशी मागणी शिरोडा वेळागर भुमीपुत्र संघ या संस्थेच्या पदाधिका-यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची भेट घेत लेखी निवेदन व चर्चेद्वारे मागणी केली आहे.

      यावेळी शिरोडा वेळागर भुमीपुत्र संघाचे खजिनदार जगन्नाथ डोंगरेसदस्य जनार्दन पडवळनाना कांबळीमंगेश डोंगरेनंदकिशोर कांबळीमिलिंद रेडकर आदी उपस्थित होते.

      ताज प्रकल्पासाठी शिरोडा-वेळागर भुमीपुत्र संघ या संस्थेच्या १२० सदस्यांनी या भागाच्या विकासासाठी जमीन दिली. गेल्या ३२ वर्षात कांहीच झाले नाही. असे असताना शासनाने मंत्री दिपक केसरकर यांनी पर्यटन दृष्टिकोन ठेवून जिल्हाधिकारीप्रांताधिकारीतहसिलदारएम.टी.डी.सी. अधिकारी व ताज प्रकल्पाचे प्रतिनिधींसमवेत बैठक घेतली. यात ज्यांनी जमिनी दिल्या त्यांना वाढीव नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला. जानेवारी पहिल्या आठवड्यापासून तीन टप्प्यात वाढीव नुकसान भरपाई देण्याचे तशा सूचना वजा आदेश जिल्हाधिकारी यांना श्री.केसरकर यांनी दिले. असे असताना प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईबाबत जमीन देणा-या भुमीपुत्रांतून तीव्र नाराजी पसरलेली आहे. आता शासनाने तातडीने ती वाढीव नुकसान भरपाई दोन टप्प्यात द्यावी. या मागणीने जोर धरला आहे. आपण मंत्री महोदयांनी दिलेल्या आदेशाची पूर्तता करून जमिनीचा सर्व पूर्ण झालेल्या जमीन मालकांना लवकरात लवकर वाढीव नुकसान भरपाईचे वाटप करावे. अशी आमची मागणी असल्याचे लेखी निवेदनांत नमुद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Close Menu