मिनी मॅरेथॉन स्पर्धेत ४१० धावपटूंचा सहभाग

दीपकभाई केसरकर मित्रमंडळ सावंतवाडी व शिवसेना वेंगुर्ला यांनी पुरस्कृत केलेल्या येथील शाश्वत सेवा बहुउद्देशीय संस्था व जागृती कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाने आयोजित केलेल्या संजय मालवणकर स्मृती शाश्वत कला-क्रीडा जागृतोत्सवातील मिनी मॅरेथॉन स्पर्धेला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बालवाडी ते खुल्या गटात मुली व मुलांच्या स्वतंत्र विभागात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत तब्बल ४१० धावपटूंनी सहभाग घेतला. खुल्या गटातून देवगडची प्रियांका लाड व कोचरेच्या संतोष वेंगुर्लेकरने वेगवान धावपटूचा मान मिळविला. स्पर्धेचा शुभारंभ दै. तरुण भारत संवादच्या सिंधुदुर्ग-रत्नागिरी आवृत्तीचे संपादक शेखर सामंत व शिवसेनेचे वेंगुर्ला शहर प्रमुख उमेश येरमयुवासेना शहरप्रमुख संतोष परबकलावलयचे अध्यक्ष बाळू खामकर व इंजिनियर विनय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.

      स्पर्धेतील प्रथम पाच पुढीलप्रमाणे – बालवाडी मुली- पूनर्वी दळवी व मिरा मिसाळ (शिवाजी प्राग.)पियुष जाधव (वजराट नं. ३)तनिषा सातार्डेकर (देसाई स्कूल वेंगुर्ला),  युगा खानोकर (सिंधुदुर्ग विद्या निकेतन), मुलगे-शिवम जाधव (शिवाजी प्राग.)महंत शेर्लेकर (वेतोरे हायस्कूल)दर्शिल शेट्ये (रेडी बालवाडी)रोहन शेख (शिवाजी प्राग.)विदीश कुडाळकर (आडेली)पहिली ते दुसरी-मुली-शायना डिसोजा (उभादांडा नं. २)हर्षिका सपकाळ (मठ कणकेवाडी)मोरिनीशा शेख (वेंगुर्ला)अदिती खांदे – (वजराट)सिद्धी जाधव (वेंगुर्ला नं. ४)मुलगे – तेजस केणीअस्मित गिरप (वेंगुर्ला नं.१)आराध्या मिराशी (कडावल नं १)इशान फर्नांडिसभार्गव पवार (वेंगुर्ला)तिसरी ते चौथी-मुली- दिया मालवणकर (वेंगुर्ला नं.३)अनन्या कुंभार (पाट)आदिती मिराशी (कडावल नं.१)युक्ता राणे (वजराट)सान्वी काकडे (उभादांडा नं.१)मुलगे-प्रिन्स भारती (वेंगुर्ला नं.४)मोहम्मद तौफिक व आदिन शेख (शिवाजी प्राग.)हर्षद खवणेकर (उभादांडा)वीर धोंड (शिवाजी प्राग.)पाचवी ते सातवी-मुली -महिमा मोहिते (मालवण)इंदुजा पेडणेकर (उभादांडा नं.३)आकांशा कुंभार (पाट)मान्यता पेडणेकर (वेंगुर्ला नं.३)मेहक शेख (वेंगुर्ला हाय.)मुलगे-हर्ष म्हाडदळकर (वेंगुर्ला हाय.)लखन कुबल (उभादांडा नं.३)श्रवण देवासी (वेंगुर्ला नं.३)कृष्णा पाटकर (पाट हाय.)राज प्रजापती (वेंगुर्ला हाय.)आठवी ते दहावी-मुली- सेहा तेरसे (प्रागंड हाय.)विधी परब (वेंगुर्ला हाय.)विभावरी मांजरेकर (वेंगुर्ला)आलिशा कुबल (उभादांडा हायस्कूल)आर्या कापरे (नेमळे हाय.)मुलगे-यश राणे (आडेली हाय.)चिन्मय राणे व प्रदीप प्रजापती (वेंगुर्ला हाय.)चैतन्य राणे व हर्ष परब (आडेली हाय.),  खुला गट-महिला- प्रियांका लाड (देवगड),  रसिका बाळकृष्ण (पारपोली)गौरी दळवी (पाट)सलोनी कांबळे (कुडाळ)लिना धुरी (मालवण)पुरुष- संतोष वेंगुर्लेकर (कोचरा)विराज भुते (उभादांडा)जयेश सावंत (भडगाव)आदित्य सुतार (पांग्रड) व भविष्य गंगावणे (कुडाळ)

      जागृती मंडळाचे अध्यक्ष दिलीप मालवणकरक्रीडा प्रशिक्षक जयराम वायंगणकरतालुका क्रीडा केंद्राचे प्रशिक्षक जया चुडनाईकसंजिवनी परब-चव्हाणस्पर्धा प्रमुख ऐश्वर्या मालवणकरमहेंद्र मातोंडकरईशा मालवणकरजागृती मंडळाचे प्रशांत मालवणकरअमोल सावंतविवेक राणेशेखर साळगावकरव्हळीयप्पा तलवारसुनील चव्हाणअमृत काणेकरशशिकांत परबरुपाली वेंगुर्लेकर-आचार्यप्रतिक मालवणकरभूषण मालवणकरमहेंद्र घाडीरवी पांगमपिंट्या कुडपकरपिंट्या मालवणकरअरविंद चव्हाणचारुदत्त नार्वेकरगौरेश सावंतबाळा सावळनवनाथ सातार्डेकरगोविंद सावंतशंकर कोणेकरविनायक मालवणकरसंग्राम सामंतनंदलाल नार्वेकरविवेक आरोलकरदत्तात्रय राणेगौरेश वायंगणकर आदींनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Close Menu