जिल्ह्याच्या कौशल्यवृद्धीमध्ये मानवसाधनचा मोलाचा वाटा-पालकमंत्री चव्हाण

सिधुदुर्ग जिल्ह्याच्या कौशल्यवृद्धीमध्ये मानव साधन विकास संस्थेसारख्या संस्थांचा असलेला सहभाग खूप मोलाचा असून अधिकाधिक रोजगार उपलब्ध होण्यासाठी अशाप्रकारच्या कार्यक्रमांना पालकमंत्री म्हणून सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल अशी ग्वाही सिधुदुर्गाचे पालकमंत्री रविद्र चव्हाण यांनी वॉटर स्पोर्टस परवाना व प्रमाणपत्र वितरण प्रसंगी आरवली येथे दिली.

      सिधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ८७ मच्छिमार सिधुपुत्रांना गोवा येथे वॉटर स्पोर्टसचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देऊन केंद्रीय संस्थेमार्फत अधिकृत परवाना देण्याचा स्तुत्य कार्यक्रम आज शुक्रवारी आरवली-सागरतीर्थ येथील आराकिला‘ या पंचतारांकित रिसॉर्टवर संपन्न झाला. यावेळी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईकपालकमंत्री रविद्र चव्हाणराष्ट्रीय सहकार धोरण समितीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूनाबार्डचे अध्यक्ष के.व्ही.शाजीआय.सी.आय.सी.आय.फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय दत्तासी.आय.आय.चे डॉ.राजेश कपूर आदी उपस्थित होते. 

      मानव साधन विकास संस्था ही महिलाशेतकरीमच्छिमारयुवामाजी सैनिक व आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांच्या सर्वांगिण विकासासाठी कार्यरत आहे. कोकण किनारपट्टीचे सतत वृद्धिगत होणारे पर्यटनमूल्य लक्षात घेऊन सिधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमार युवकांसाठी मानव साधन विकास संस्था संचलित परिवर्तन केंद्र प्रकल्प सिधुदुर्ग आणि आय.सी.आय.सी.आय.फाऊंडेशन‘ यांच्या संयुक्त विद्यमाने सिधुपुत्र‘ हा उपजिविका निर्मितीक्षम कार्यक्रम ऑक्टोबर २०२३ ते जानेवारी २०२४ या दरम्यान राबविण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत लाईफ सेव्हिग तंत्रवॉटर स्पोर्टस्‘ व पॉवर बोट हॅण्डलिग‘ याचे निवडक ८७ मच्छिमार युवक व युवतींना प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण भारतातील नामांकित भारतीय पर्यटन आणि यात्रा प्रबंध संस्थान अंतर्गत राष्ट्रीय जलक्रीडा संस्थान-गोवा या पर्यटन मंत्रालयभारत सरकार अधिकृत संस्थेमध्ये देण्यात आले. विशेष बाब म्हणजे प्रथमच सिधुदुर्ग जिल्ह्यातील १० सिधुकन्यांनी हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले.  प्रशिक्षण पूर्ण करणा-या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र व वॉटर स्पोर्टस परवाना वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

      सुरेश प्रभू आणि त्यांच्या संस्थेने राबविलेल्या या अभिनव कार्यक्रमाबद्दल केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी विशेष कौतुक करून पर्यटन वाढीमध्ये अशाप्रकारच्या शास्त्रशुद्ध सुविधांचा अंतर्भाव करण्याचा हा दुरदृष्टी विचार केल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन केले.

      मानवसाधन विकास संस्थेच्या विकासातून गेल्या २५ वर्षात या जिल्ह्यात निर्माण केलेल्या कौशल्यरोजगारपर्यटनपर्यावरण व महिला सक्षमिकरणातील कामाचा उहापोह करून कोकणच्या विकासासाठ सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले. सिधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी नाबार्ड सर्वोतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन नाबार्डचे अध्यक्ष के.व्ही.शाजी यांनी दिले.

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानव साधन संस्थेचे प्रकल्प संचालक नंदो किशोर परब यांनी तर आभार योगेश प्रभू यांनी मानले. यावेळी नकुल पार्सेकरसंजिव कर्पे, सुधीर पालव आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu