सिधुपूत्रांना मिळणार वॉटर स्पोर्टस परवाना

सिधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्लामालवणदेवगड या तालुक्यातील वॉटर स्पोर्टस प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सिधुपूत्रांना १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता आरवली-सागरतीर्थ येथील आराकिला‘ या पंचतारांकित रिसॉर्टवर प्रमाणपत्र व वॉटर स्पोर्टस परवाना वितरण करण्यात येणार आहे.

      मानव साधन विकास संस्था ही महिलाशेतकरीमच्छिमारयुवामाजी सैनिक व आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांच्या सर्वांगिण विकासासाठी कार्यरत आहे. कोकण किनारपट्टीचे सतत वृद्धिगत होणारे पर्यटनमूल्य लक्षात घेऊन सिधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमार युवकांसाठी मानव साधन विकास संस्था संचलित परिवर्तन केंद्र प्रकल्प सिधुदुर्ग आणि आय.सी.आय.सी.आय.फाऊंडेशन‘ यांच्या संयुक्त विद्यमाने सिधुपुत्र‘ हा उपजिविका निर्मितीक्षम कार्यक्रम ऑक्टोबर २०२३ ते जानेवारी २०२४ या दरम्यान राबविण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत लाईफ सेव्हिग तंत्रवॉटर स्पोर्टस्‘ व पॉवर बोट हॅण्डलिग‘ याचे निवडक ८७ मच्छिमार युवक व युवतींना प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण भारतातील नामांकित भारतीय पर्यट आणि यात्रा प्रबंध संस्थान अंतर्गत राष्ट्रीय जलक्रीडा संस्थान-गोवा या पर्यटन मंत्रालयभारत सरकार अधिकृत संस्थेमध्ये देण्यात आले. विशेष बाब म्हणजे प्रथमच सिधुदुर्ग जिल्ह्यातील १० सिधुकन्यांनी हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.

      प्रशिक्षण पूर्ण करणा-या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र व वॉटर स्पोर्टस परवाना वितरण करण्यात येणार असून यावेळी राष्ट्रीय सहकार धोरण समितीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूकेंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईकपालकमंत्री रविद्र चव्हाणनाबार्डचे अध्यक्ष के.व्ही.शाजीआय.सी.आय.सी.आय.फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय दत्तासी.आय.आय.चे डॉ.राजेश कपूर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Close Menu