वेंगुर्ल्यातील श्री सातेरीचा जत्रोत्सव फक्त तालुका मर्यादित

कोरोनाचे संकट असल्याने यावर्षी वेंगुर्ला येथील श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव साध्या पद्धतीने व तालुका मर्यादित करण्याचा निर्णय देवस्थान विश्वस्त समिती, उत्सव समिती व मानकरी मंडळी यांच्या झालेल्या सभेमध्ये घेण्यात आला आहे.       वेंगुर्ल्याची ग्रामदेवता व वेंगुर्ला तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणा-या…

0 Comments

सलग १५व्या रक्तदान शिबिरास ४६ जणांचा प्रतिसाद

वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस आयोजित सलग १५ व्या रक्तदान शिबिरास दात्याचा उत्तम प्रतिसाद लाभला असून एकूण ४६ जणांनी रक्तदान केले.   श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय तुळस येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन सरपंच शंकर घारे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपसरपंच सुशील परब, वैद्यकीय अधिकारी डॉ.लादे,…

0 Comments

होडावडा ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

जनसुविधा योजना व १४ वा वित्त आयोगा अंतर्गत उभारण्यात आलेल्या होडावडा ग्रामपंचयातीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते फित कापून व फलकाचे अनावरण करुन करण्यात आले. यावेळी सभापती अनुश्री कांबळी, गटविकास अधिकारी उमा पाटील, पं.स.सदस्य यशवंत परब, सुनील मोरजकर, सरपंच अदिती…

0 Comments

वेंगुर्ला भाजपाची कातकरी वस्तीत अनोखी भाऊबीज

सर्वत्र दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असताना भटक्या विमुक्त जातीतील कातकरी समाजातील लोकांना फराळ व मिठाई तसेच महिलांना साडी भेट देवून अनोख्या पद्धतीने भाऊबीज साजरी करत वेंगुर्ला भाजपाने समाजापुढे एक वेगळा आदर्श घातला आहे. हा कार्यक्रम नुकताच कॅम्प येथील त्यांच्या वस्तीवर पार पडला.…

0 Comments

एकलव्य नेमबाजी प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या एकलव्य नेमबाजी प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन कॅम्प स्टेडियम येथे आंतरराष्ट्रीय पंच विक्रम भांगले यांच्या हस्ते फित कापून तर नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले.       विक्रम भांगले यांनी वेंगुर्ल्यातील या प्रशिक्षण केंद्रामुळे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होतील. त्यासाठी आपल्याकडील मुलांना लागणारे मार्गदर्शन…

0 Comments

ऑनलाईन नरकासूर स्पर्धेत जबरदस्त राऊळवाडा आणि हॉस्पिटलनाका मित्रमंडळ प्रथम

कोरोना रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वेंगुर्ला येथील विठ्ठलवाडी सहपरिवारातर्फे १३ नोव्हेंबर रोजी वेंगुर्ला तालुका मर्यादित ‘ऑनलाईन नरकासूर‘ स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत मोठ्या गटात १० आणि लहान गटात १४ मंडळांनी सहभाग घेतला होता. सहभागी झालेल्या स्पर्धक मंडळांनी आपापल्या नरकासूराचे फोटो आयोजकांकडे व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून…

0 Comments

वेंगुर्ल्यात ‘कायापालट‘ लघुपटाचा शुभारंभ

श्री सातेरी व्यायामशाळा, श्री सातेरी कला अकादमी आणि विद्या एंटरटेनमेंट यांच्या सौजन्याने ‘व्यसन मुक्ती‘ या सामाजिक विषयावर व्यसन मुक्त अभियानांतर्गत ‘कायापालट‘ या लघुपटाचा शुभारंभ नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते आज सातेरी व्यायामशाळा येथे संपन्न झाला.       यावेळी नगराध्यक्ष यांनी वेंगुर्ल्यातील उदयोन्मुख तरूण कलाकारांचे…

0 Comments

किरातच्या खुल्या लेखन स्पर्धेत डॉ. हर्षदा देवधर प्रथम

      पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक अरुण सावळेकर यांनी वेंगुर्ला येथील ‘किरात दिवाळी अंका‘साठी सिधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांना प्रोत्साहन म्हणून आयोजित केलेल्या खुल्या कथा लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये डॉ.हर्षदा देवधर (झाराप) यांनी प्रथम, सरिता पवार (कणकवली) यांनी द्वितीय तर…

2 Comments

पोलिस पाटीलांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव

वेंगुर्ला तालुक्यातील १८ पोलिस पाटीलांना कोरोना योद्धा म्हणून भाजपाच्यावतीने जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष मधुसूदन मेस्त्री, निकिता पोखरे (आजगांव), निलेश पोळजी (आसोली), ऋतिका नाईक (पाल), बापू गावडे (अणसूर), आश्विनी खवणेकर (मोचेमाड), विजय नार्वेकर (उभादांडा), प्रकाश…

0 Comments

९ महिलांना ‘नवदुर्गा‘ पुरस्कार

‘जागर नवरात्रीचा-सन्मान नारी शक्तीचा‘ या कार्यक्रमांतर्गत वेंगुर्ला भापजाच्या महिला मोर्चाच्या निमित्ताने तालुक्यामध्ये कोरोना महामारीच्या काळातही समाजासाठी अविरत काम करणा-या व विविध क्षेत्रात प्रशंसनीय अशी कामगिरी करुन आपल्या नावाची छाप निर्माण करणा-या ९ रणरागीणींचा  भाजपा महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे यांच्या हस्ते ‘नवदुर्गा पुरस्कार‘ पुरस्कार…

0 Comments
Close Menu