फुलकिडीचा प्रादुर्भाव रोखण्यात किटकनाशके कुचकामी!

सद्यस्थितीमध्ये कोकण विभागातील बहुतांशी आंबा बागांमध्ये फुलकिडी (थ्रीप्स) चा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सद्या बाजारात उपलब्ध असलेले कुठलेही कीटकनाशक फुलकिडीच्या नियंत्रणासाठी प्रभावी दिसून येत नाही. त्यामुळ फुलकिडीच्या नियंत्रणासाठी बाजारपेठेत उपलब्ध प्रभावी असलेली किटकनाशके वापरून प्रायोगिक प्रक्षेत्र प्रात्यक्षिके सुरू करण्यात आली आहेत. शेतक­यांना मार्गदर्शन…

0 Comments

रेडी यशवंतगड संवर्धनासाठी ९ कोटींचा निधी मंजूर

२०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तत्कालीन वित्तमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवकालीन किल्ल्यांच्या जतन व संवर्धनासाठी ३०० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात याबाबतच्या १०३ कोटीच्या पुरवणी मागणीस मान्यता देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने…

0 Comments

भिंतीचित्र स्पर्धेत अक्षय जाधव प्रथम

माझी वसुंधरा अभियान ४.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२४ अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे आयोजित केलेल्या भितीचित्र महोत्सवात अक्षय जाधव याने प्रथम क्रमांक पटकाविला. त्याने नगरवाचनालय येथे शाडू मातीपासून आकर्षक मूर्ती बनवून पारंपरिक लोककला जपणारे मूर्तीकार, कोकणातील स्थानिक मच्छिमार, वेंगुर्ला शहराची ओळख असलेले शून्य कचरा केंद्र…

0 Comments

जिल्ह्याच्या कौशल्यवृद्धीमध्ये मानवसाधनचा मोलाचा वाटा-पालकमंत्री चव्हाण

सिधुदुर्ग जिल्ह्याच्या कौशल्यवृद्धीमध्ये मानव साधन विकास संस्थेसारख्या संस्थांचा असलेला सहभाग खूप मोलाचा असून अधिकाधिक रोजगार उपलब्ध होण्यासाठी अशाप्रकारच्या कार्यक्रमांना पालकमंत्री म्हणून सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल अशी ग्वाही सिधुदुर्गाचे पालकमंत्री रविद्र चव्हाण यांनी वॉटर स्पोर्टस परवाना व प्रमाणपत्र वितरण प्रसंगी आरवली येथे दिली.       सिधुदुर्ग…

0 Comments

सिधुपूत्रांना मिळणार वॉटर स्पोर्टस परवाना

सिधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला, मालवण, देवगड या तालुक्यातील वॉटर स्पोर्टस प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सिधुपूत्रांना १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता आरवली-सागरतीर्थ येथील ‘आराकिला‘ या पंचतारांकित रिसॉर्टवर प्रमाणपत्र व वॉटर स्पोर्टस परवाना वितरण करण्यात येणार आहे.       मानव साधन विकास संस्था ही महिला, शेतकरी, मच्छिमार, युवा, माजी सैनिक व आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांच्या सर्वांगिण विकासासाठी…

0 Comments

महोदय पर्वणीनिमित्त उसळला भाविकांचा जनसागर

शुक्रवारी झालेल्या पौष अमावास्येला महोदय पर्वणी निमित्त वेंगुर्ला सागरेश्वर व आरवली सागरतीर्थ समुद्रकिना-यावर भाविकांचा जनसागर उसळला या ठिकाणी विविध गावच्या ग्रामदेवता, तरंगदेवतासहित हजारो भाविक, ग्रामस्थांनी तिर्थस्नान केले.       पौष अमावास्या व श्रवण नक्षत्र एकत्र आल्याने झालेल्या महोदय पर्वणीला सागरेश्वर समुद्र किनारी वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत…

0 Comments

वेंगुर्ल्यातील अमृता कॅश्यू इंडस्ट्रीजला ‘सुवर्ण पुरस्कार‘

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्काराचे वितरण तसेच देशातील २४ तज्ज्ञ संस्थांसोबत सामंजस्य करार पुणे-वाकड येथील हॉटेल खमी टिपटॉप येथे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमात कोकण क्षेत्र उद्योग विभागमधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वेंगुर्ला येथील ‘अमृता काजू इंडस्ट्रीज‘ यांना सन २०१८-१९च्या महाराष्ट्र…

0 Comments

शिक्षक व विद्यार्थ्यांनी सामाजिक परिस्थितीचे भान ठेवणे आवश्यक-गावडे

शिक्षणाने परिवर्तन घडते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ते तळमळीने आत्मसात केले पाहिजे. तर्कशुद्ध विचार करता येणे ही आजच्या काळाची गरज आहे. तसेच आजच्या सामाजिक परिस्थितीचे भान शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उद्योजक विलास गावडे यांनी केले.       वेंगुर्ला एज्युकेशन सोसायटीचे रा.कृ.पाटकर हायस्कूल आणि रा.सी.रेगे…

0 Comments

आनंदयात्रीच्या ‘श्रावणधारा‘ लघू काव्य संग्रहाचे प्रकाशन

सातत्याने साहित्य विषयक उपक्रम घेणा-या वेंगुर्ला येथील आनंदयात्री वाङ्मय मंडळाचा स्नेहमेळावा साई दरबार हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाला. या स्नेहमेळाव्यात मागील श्रावण महिन्यात आनंदयात्रीतील कवींनी श्रावणातील पावसावर व निसर्गावर केलेल्या विविध कवितांचे संकलन करून आनंदयात्रीच्या ‘श्रावणधारा‘ या लघु काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रा. पांडुरंग कौलापुरे यांच्या हस्ते झाले.…

0 Comments

विकास धोरणात ‘व्हिजन वेंगुर्ला‘ची भूमिका निर्णायक ठरणार

वेंगुर्ल्याच्या विकास धोरणात ‘व्हिजन वेंगुर्ला‘ची भूमिका निर्णायक आणि तितकीच महत्त्वाची ठरणार असल्याचा निर्धार मुंबईस्थित वेंगुर्लेकरांनी केला. मुंबईत आयोजित केलेल्या विशेष स्नेहसंवाद कार्यक्रमात हा निर्धार करण्यात आला.       ‘स्नेहसंवाद वेंगुर्लेकरांशी‘ अंतर्गत व्हिजन वेंगुर्ला ‘धोरण वेंगुर्ल्याचे, तोरण उत्कर्षाचे‘ हा विशेष कार्यक्रम दादर येथील वनमाळी सभागृहात पार पडला. यावेळी ओळख आपल्या…

0 Comments
Close Menu