अत्याचार झाल्यास फायर ब्रिागेडसारखे उभे रहा – प्रमोद जठार

भाजप पक्ष हा असा पक्ष आहे, प्रत्येक कार्यकत्र्याची अग्निपरीक्षा घेतो आणि त्यानंतर एक ना एक दिवस त्याला संधी देतो. माझे पद समन्वयाकरीता आहे. आमच्या देशाच्या सीमा सुरक्षित राहिल्या पाहिजेत म्हणून भाजप पक्ष काम करीत आहे. महिलेवर अत्याचार झाल्यास माझा भाजपाचा कार्यकर्ता फायर ब्रिागेडसारखा उभा राहिला पाहिजे आणि जो अत्याचार करले त्याला त्याच ठिकाणी थांबवून त्याचे निर्दालन केले पाहिजे असा संदेश स्वागत कार्यक्रमावेळी विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी वेंगुर्ला येथे दिला.
नुकतेच विधान परिषदेच्या आमदारपदी निवड झालेले प्रमोद जठार हे सिंधुदुर्ग दौ-यावर आले असता त्यांनी वेंगुर्ला येथील भाजप कार्यालयाला भेट देत पदाधिकारी आणि कार्यकत्र्यांशी संवाद साधला. यावेळी वेंगुर्ला भाजपा पक्षाच्यावतीने प्रदेश कार्यकारीणी सदस्य शरद चव्हाण यांच्या हस्ते आमदारपदी निवड झाल्याबद्दल प्रमोद जठार यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा कार्यकारीणी सदस्य साईप्रसाद नाईक, नगराध्यक्ष दिलीप गिरप, जि.प.सदस्य प्रितेश राऊळ, पंचायत समिती सभापती शंकर घारे, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर तसेच सचिन वालावलकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार जठार म्हणाले की, संस्कृती चिरंतन ठेवण्याचे काम करणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत. भाजपाचे कार्यालय प्रत्येक कार्यकत्र्याच्या घराघरात झाले पाहिजे. सगळ शतप्रतिशत झाले पाहिजे. जेवढी आपली कार्यालये विशाल आहेत, तेवढी आपली मनं सुद्धा विशाल असायला हवीत. आपल्या पक्षात येणा-या प्रत्येकाचा सन्मान करा असे आवाहन जठार यांनी उपस्थितांना केले. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, नगराध्यक्ष दिलीप गिरप, जि.प.सदस्य प्रितेश राऊळ, पंचायत समिती सभापती शंकर घारे यांनीही आपले मनोगत व्यक्त करून आमदार जठार यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, आकांक्षा परब, शितल आंगचेकर, काजल कुबल, रिया केरकर, गौरी माईणकर, सदानंद गिरप, प्रणव वायंगणकर, विनय नेरूरकर, प्रितम सावंत, सुधीर पालयेकर, माजी नगरसेवक साक्षी पेडणेकर, श्रेया मयेकर, पं.स.सदस्य शितल राऊत, संकेत धुरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्तविकास व आभार जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी केले.

Leave a Reply