गुरु अभिवादन सोहळ्यात विद्यार्थ्यांनी घडविले उत्कृष्ट कलेचे दर्शन

श्री चिंतामणी प्रतिष्ठान संचलित श्री चिंतामणी संगीत विद्यालयाचा गुरु अभिवादन सोहळा थाटात संपन्न झाला. या सोहळ्यात संगीत विद्यालयातील शिष्यवृंदांच्या तबला, पखवाज, हार्मोनियम, सोलो वादनासह गायनांचेही सादरीकरण करण्यात आले. तसेच पखवाज व तबला वादन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. संगीत विद्यालयाचे संचालक तथा पखवाज विशारद निलेश पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्य परिवाराच्यावतीने येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

         यावेळी व्यासपिठावर आंतराष्ट्रीय हॉलीबॉल पंच अशोक दाभोलकर, मंजुषा दाभोलकर, तबला शिक्षक प्रमोद मुंडये, पखवाज शिक्षक मोहन मेस्त्री, महेश बोवलेकर, हार्मोनियम वादक गजानन मेस्त्री, गायक वैभव परब बुवा, शिवप्रसाद घारे, श्री.बांदवलकर गुरुजी, सुनिल नाईक आदी उपस्थित होते.

        प्रसिद्ध तबला वादक बंड्या धारगळकर, नाट्य दिग्दर्शक दादा हळदणकर, नार्वेकर, दशावतार कलाकार पप्पू नांदोस्कर, निवेदक काका सावंत, शुभम धुरी, बाबुराव खवणेकर तसेच विद्यालयाचे यशस्वी विद्यार्थी मनिष तांबोस्कर, गोल्ड मेडल विजेता तेजस मेस्त्री, भाविका खानोलकर यांचाही सत्कार करण्यात आला. तर लोकमान्य को.ऑफ.मल्टीपर्पज बँकेच्या माध्यमातून निलेश पेडणेकर यांना सन्मानित करण्यात आले.       

         या कार्यक्रमात एकूण ८४ विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. तर यामेश खवणेकर याने सादर केलेल्या बासरी वादनाला प्रसन्न गावडे आणि भूषण सावंत यांनी उत्तम पखवाज व तबला साथ देत कार्यक्रमात रंगत आणली. हा कार्यक्रम विनाखंड १३ तास सुरु होता.

        कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चिंतामणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रविण कांदळकर, सर्वेश तांडेल, हरेश पडवळ, भाई वेंगुर्लेकर, महेश मुणनकर, सागर सावळ, प्रतिक शेटकर, सचिन नाईक, गणेश आरावंदेकर, सुयोग कासकर, काका पालकर, पांडुरंग माडये, मंदार आरावंदेकर, वेदांग बोवलेकर, राजाराम पिंगुळकर, नितीन परब, करण परब आदींनी विशेष मेहनत घेतली.

         कार्यक्रमाची सांगता सत्यनारायण कळंगुटकर, तेजस मेस्त्री आणि पुरुषोत्तम परब यांनी सादर केलेल्या अभंग, गौळण आणि भैरवीने करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काका सावंत आणि शुभम धुरी यांनी केले.

Leave a Reply