दाभोली नाका येथे प्रवासी शेडचे लोकार्पण

रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनच्या माध्यमातून वेंगुर्ला शहरातील दाभोली नाका येथील एसटी बस थांबा येथे उभारण्यात आलेल्या प्रवासी निवारा शेड या लोकाभिमुख कामाचा लोकार्पण सोहळा १५ जुलै रोजी रोटरी ३१७०चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अरूण भंडारे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सन २०२५-२६चे अध्यक्ष आनंद बोवलेकर, सचिव डॉ.राजेश्वर उबाळे, राजेश घाटवळ, विद्यमान अध्यक्ष अॅड.प्रथमेश नाईक, अनमोल गिरप, डॉ.प्रशांत कोलते, दादा साळगांवकर, प्रणय तेली आदी उपस्थित होते. या प्रवासी शेड उपलब्धतेमुळे प्रवाशांमधून समाधानाचे वातावरण आहे. या उपक्रमासाठी सन २०२५-२६चे प्रेसिडेंट आनंद बोवलेकर आणि सचिव राजेश्वर उबाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply