दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी जीवन जगण्यासाठी आवश्यक सहाय्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने साईकृपा दिव्यांग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल आणि दिव्यांग पुनर्वसन केंद्र, ओरस यांच्यावतीने उभादांडा येथील कल्पना एकनाथ बांबार्डेकर या दिव्यांग भगिनीला व्हीलचेअर प्रदान करण्यात आली. उभादांडा शाळा क्र. २ परिसरात राहणाऱ्या कल्पना बांबार्डेकर यांना दैनंदिन हालचाली करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यांची गरज ओळखून संस्थेने त्यांना व्हीलचेअर उपलब्ध करून देत सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श घालून दिला. संस्थेचे प्रतिनिधी अनिल शिंगाडे यांच्या हस्ते व्हीलचेअर सुपूर्द करण्यात आली. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, सुनील कांबळी, हर्षद खरात, सेजल तोरसकर आदी उपस्थित होते.व्हीलचेअर मिळाल्याने कल्पना बांबार्डेकर व त्यांच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त करत संस्था व सहकार्य करणाऱ्या सर्व दात्यांचे आभार मानले.
