‘नमो उद्यान’ प्रकल्पाचा शुभारंभ

        वेंगुर्ला शहरातील खांबड भटवाडी येथे पहिले ‘नमो उद्यान’ विकसित होत आहे. या उद्यानामुळे  शहरातील पर्यटनाला चालना आणि रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. संबंधितांनी हे उद्यान दर्जेदार असे बनवावे. तसे बनेल याची मला खात्री आहे. कारण वेंगुर्ले मधील आता पर्यंत झालेली कामे ही दर्जेदार आणि राज्यात नावलौकिक करणारी झाली आहेत. असे शहर विकासासाठी नवीन संकल्पना घेऊन विकास कामे आणा त्या कामांना शासनाच्या माध्यमातून भरघोस निधी आम्ही उपलब्ध करुन देऊ असा विश्वास मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी बोलताना दिला.  या उद्यानाचे भूमिपूजन नितेश राणे यांच्या हस्ते  झाले.
        या भूमिपूजन कार्यक्रमाला नगराध्यक्ष दिलीप गिरप, भाजप तालुका अध्यक्ष पप्पू परब, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, बांधकाम सभापती प्रणव वायंगणकर, महिला बालकल्याण सभापती गौरी मराठे, मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, शिवसेना जिल्हा समन्वयक
सचिन वालावलकर, आरोग्य समिती सभापती गौरी माईणकर, मागासवर्गीय कल्याण समिती सभापती युवराज जाधव, क्रीडा समिती सभापती सचिन शेटये तसेच नगरसेवक दाजी परब, प्रितम सावंत, रविंद्र शिरसाट, संदेश निकम, सुधीर पालयेकर, प्रशांत आपटे, सदानंद गिरप,  विनय नेरूरकर, सुषमा प्रभूखानोलकर, आकांक्षा परब, शीतल आंगचेकर, समिधा रेडकर, लीना म्हापणकर, काजल कुबल, सुमन निकम तसेच भाजप पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
           यावेळी बोलताना नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी हे काम वेंगुर्ल्यासाठी दिल्याबद्दल पालकमंत्री यांचे आभार मानले. शासनाच्या ‘नमो उद्यान’ स्पर्धेत वेंगुर्ला नगरपरिषद प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल असे  गिरप यांनी सांगितले.
तर या भागात निवडणुकीचा प्रचार करताना हा भाग ग्रामीण दिसत असल्याचे पालकमंत्री म्हणाले होते. तसेच निवडून आल्यावर याभागात विकास कामे प्राधान्याने घेणार असेही म्हटले होते. त्यांनी आपला शब्द पाळून हे काम दिल्याबद्दल उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी आभार मानले. तर तालुकाध्यक्ष पप्पू परब यांनी हे विकासात्मक काम एक कोटी रुपयांचे पालकमंत्री यांच्या माध्यमातून वेंगुर्ला शहराला मिळाले आहे. लोकाभिमुख काम करणारा भाजपा पक्ष असून दिलेला शब्द पाळतो हे या कामावरून दिसून येत आहे असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply