प्रसन्ना देसाई यांना ‘बेस्ट सपोर्ट फॉर डिसेबल’ राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

गडहिंग्लज येथील ‘ऑनररी कॅप्टन आबा पाटील दिव्यांग सोशल फाउंडेशन कडगाव’ संस्थेच्यावतीने दिला जाणारा वर्ष २०२५-२६ चा अत्यंत प्रतिष्ठेचा “बेस्ट सपोर्ट फॉर डिसेबल” हा राज्यस्तरीय पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते प्रसन्ना देसाई यांना २७ मे रोजी ऑनररी कॅप्टन आबा पाटील दिव्यांग सोशल फाऊंडेशन कडगांवचे संस्थापक अध्यक्ष शारदा पाटील आणि संस्थापक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर  ऑनररी कॅप्टन आबा पाटील दिव्यांग सोशल फाऊंडेशनचे सचिव अक्षता पाटील, सदानंद पाटील, उपाध्यक्ष संदिप पाटील, देवदत्त पाटील, लता पाटील, साहस प्रतिष्ठानचे रूपाली पाटील उपस्थित होते. हा पुरस्कार प्रदान सोहळा वेंगुर्ला येथील भाजपा कार्यालयात संपन्न झाला.
दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठी, त्यांच्या पुनर्वसनासाठी आणि सामाजिक उन्नतीसाठी प्रसन्ना देसाई यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात केलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. त्यांच्या याच सातत्यपूर्ण आणि प्रामाणिक सामाजिक सेवेची दखल घेऊन ‘ऑनररी कॅप्टन आबा पाटील दिव्यांग सोशल फाउंडेशन’च्यावतीने यावर्षीचा हा सर्वोच्च राज्यस्तरीय सन्मान त्यांना देण्यात आला. ​या सोहळ्याला सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या
संख्येने उपस्थित होते. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
​पुरस्काराला उत्तर देताना प्रसन्ना देसाई यांनी संस्थेचे आभार मानले. “हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून दिव्यांग बांधवांसाठी काम करणाऱ्या प्रत्येक घटकाचा आहे. या सन्मानामुळे सामाजिक कार्याची जबाबदारी आणखी वाढली असून, यापुढेही दिव्यांग बांधवांच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर राहीन,” अशी भावना व्यक्त  केली. उपस्थित मान्यवरांनी प्रसन्ना देसाई यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना भावी सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला वेंगुर्ला व परिसरातील नागरिक, हितचिंतक आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply