बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा सामाजिक कार्यकर्ते प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयास जेईई आणि नीट परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त पुस्तके भेट म्हणून दिली आहेत. हा कार्यक्रम ११ सप्टेंबर रोजी संपन्न झाला. या पुस्तकांमुळे अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार संदर्भ साहित्य उपलब्ध होणार आहे.माजी विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाशी असलेले ऋणानुबंध जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी केलेले हे योगदार प्रेरणादायी असल्याचे प्राचार्य डॉ.धनराज गोस्वामी यांनी नमूद केले. यावेळी संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, ग्रंथपाल शुभदा माने, डॉ.सचिन परूळकर, डॉ.मनिषा मुजुमदार, डॉ.सुनिल भिसे, डॉ.कमलेश कांबळे, डॉ. संदीप वर्पे आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी प्रसन्ना देसाई यांच्या उपक्रमाचे स्वागत करून त्यांचे आभार मानले.
