रजोनिवृत्तीनंतरच्या आजारांवर उपचार व मार्गदर्शन 

महिलांना वयाच्या एका टप्प्यानंतर, विशेषतः रजोनिवृत्तीनंतर अनेक शारीरिक आणि मानसिक आजारांचा सामना करावा लागतो. ग्रामीण भागातील महिलांमध्ये याविषयी फारशी जागरूकता नसते आणि त्यांना योग्य वैद्यकीय सल्ला मिळणेही कठीण होते. हीच गरज ओळखून, डेरवण येथील बी.के. एल. वालावलकर रुग्णालय येथे आता रजोनिवृत्तीनंतरच्या आजारांवर सखोल मार्गदर्शन, समुपदेशन आणि विशेष उपचार सुरू करण्यात आले आहेत. यासाठी रुग्णालयात प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. सोनाली दामले यांची सेवा उपलब्ध झाली आहे.
ग्रामीण भागातील महिला अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, विशेषतः रजोनिवृत्तीनंतरच्या त्रासांना त्या वाढत्या वयाची लक्षणे समजून सहन करत राहतात. महिलांनी आपल्या आरोग्याशी तडजोड न करता या सुविधेचा लाभ घ्यावा. डॉ. दामले या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात रुग्णालयात उपलब्ध असणार आहेत. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त महिलांनी या मोफत समुपदेशन आणि उपचार सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन रुग्णालयाच्या संचालिका डॉ. सुवर्णा पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply