माझा वेंगुर्ला, इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला आणि हिरकणी महिला शहर स्तर संघ, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच विशाल परब पुरस्कृत ‘उत्सव रानभाज्यांचा २०२६’ अंतर्गत रानभाजी पाककृती स्पर्धा ६ सप्टेंबर रोजी सिद्धिविनायक मंगल कार्यालयात संपन्न झाली. रानभाज्या हा कोकणच्या मातीचा, निसर्गाचा आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा अनमोल ठेवा असून, हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे, असे प्रतिपादन वेदिका परब यांनी उद्घाटनप्रसंगी केले. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, भाजपाचे राजू राऊळ, प्रसन्ना देसाई, इनरव्हील क्लबच्या ज्योती देसाई, सई चव्हाण, श्रिया परब, वृंदा गवंडळकर, आरती गिरप, हिरकणी शहर स्तर संघाच्या आकांक्षा परब, अस्मिना मकानदार, शिवानी तामणेकर, रसिका राऊळ, राधा बागवे, माझा वेंगुर्लाचे राजन गावडे, यासीर मकानदार, खेमराज कुबल, अमृत काणेकर, महेश वेंगुर्लेकर, अवधुत नाईक, अमृत काणेकर, रामचंद्र शृंगारे, ऋतुजा गावडे, अमोल खानोलकर, प्रथमेश घारे, श्रेयस गावडे, भूषण मांजरेकर आदी उपस्थित होते. स्पर्धेत प्रथम-जाई नाईक (टायकाळ्याचे लाडू, मोदक, सरबत व चटणी), द्वितीय-सुश्मिता गावकर (लाजरीचे मोदक, लाडू व पेव्याचे सूप), तृतीय-सुजाता साटम (चाईच्या मोहराची जास्वंद), उत्तेजनार्थ-अनुष्का राणे (मिक्स भाज्यांचे सूप), जान्हवी सावंत (कर्टुलाचे अप्पे व लाजाळूची चटणी), मंगेश माणगावकर (शेवगा-कर्टुलीयुक्त लाडू) यांनी क्रमांक पटकाविले. स्पर्धेचे परीक्षण रश्मी कुडाळकर, डॉ. भारतेंदू आवळे आणि डॉ. बाळकृष्ण गावडे यांनी केले. सर्व विजेत्यांना गौरविण्यात आले. सूत्रसंचालन व आभार नगरसेवक प्रशांत आपटे यांनी केले.
