संदेश निकम यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

वेंगुर्ल्याचे माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांनी नुकतीच मुंबई मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमुळे निकम हे ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतच‘ असल्याचे स्पष्ट झाले असून आगामी नगरपालिका निवडणुकीत याचा मोठा फायदा पक्षाला होणार आहे.

    खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा प्रमुख संजय पडते यांच्या प्रमुख उपस्थितीत संदेश निकम यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना नेते गौरीशंकर खोत, सतीश सावंत, संदेश पारकर, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संफप्रमुख शैलेश परब, तालुकाप्रमुख यशवंत परब, शहर प्रमुख अजित राऊळ, उपजिल्हाप्रमुख प्रकाश गडेकर, श्री.नार्वेकर आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply