सिंधुदर्पण गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन

      पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून, जिल्हा पत्रकार संघाच्या पुढाकारातून सिंधुदर्पण गृहनिर्माण सोसायटीच्यावतीने सिंधुदुर्गनगरी येथे जिल्ह्रातील पत्रकारांसाठी दर्पण पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन १७ मे रोजी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाला. आई-वडिलांच्या संस्कारांची शिदोरी आणि माणुसकी याच भावनेतून आपण या प्रकल्पाला हात दिला आहे. प्रत्येक पत्रकाराला घर मिळावे, यासाठी रोवलेली ही मुहूर्तमेढ हा माझ्यासाठी ऐतिहासिक दिवस आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री यांनी केले.  भूमिपूजन सोहळ्यानंतर त्यांनी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन येथे सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ आयोजित पत्रकार स्नेहसंमेलन २०२६ व पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार आदी कार्यक्रमांना उपस्थिती दर्शविली.
पालकमंत्री यांच्या हस्ते दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थी ईशांत कुलकर्णी, हर्ष लळीत, शुभम तेली, विजया म्हाडेश्वर, युगा मातोंडकर तर इयत्ता बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थी रिद्धी वारंग, वैभव वारंग, ऋग्वेद बाणे, सोनम काळसेकर, शाल्मली घोगळे, अनिल तोंडवळकर यांचा गौरव तसेच गृहनिर्माण प्रकल्पाचे विकासक जयेश नाईक, केतकी वझे, वास्तुविशारद अभिषेक माने यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, सचिव बाळ खडपकर, गृहनिर्माण प्रकल्पाचे अध्यक्ष संतोष राऊळ यांच्यासह जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते. मराठी पत्रकार परिषदेचे प्रतिनिधी गणेश जेठे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

Leave a Reply