सेनेच्या प्रमुख पदाधिका-यांच्या घरी आदित्य ठाकरेंनी घेतले गणेश दर्शन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिका-यांच्या घरी विराजमान गणरायाचे दर्शन घेण्याच्या निमित्ताने वेंगुर्ल्यात आलेल्या युवासेना प्रमुख तथा उबाठा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी तुळस येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख यशवंत परब यांच्या घरी विराजमान बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी यशवंत परब व कुटुंबीयांनी पुष्पगुच्छ व इको फ्रेंडली गणेशाची मूर्ती भेट देत त्यांचे स्वागत केले.

    गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख नेते व पदाधिकारी यांच्या घरी विराजमान गणरायाचे दर्शन घेण्यासाठी जिल्ह्याच्या दौ-यावर उबाठा शिवसेना नेते आदित्य ठाकरे आले होते. यावेळी त्यांनी ठाकरे कुटुंबियांचे निष्ठावान पदाधिकारी यशवंत उर्फ बाळू परब यांच्या घरी विराजमान श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी खासदार विनायक राऊतआमदार वैभव नाईकयुवासेनेचे गीतेश राऊतजिल्हाप्रमुख संदेश पारकरविधानसभा संफप्रमुख शैलेश परबसागर नाणोस्करहिमांशू परबसंदेश निकमअजित राऊळप्रकाश गडेकरसंजय गावडेतुकाराम परबसुजित चमणकर यांच्यासहित पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply