कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गच्यावतीने राष्ट्रसेवेसाठी आयुष्य समर्पित केलेल्या माजी सैनिकांचा घरी जाऊन कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला. यावेळी नाईक सुभाषचंद्र सावळाराम परब (वजराठ) यांना सन्मानपत्र प्रदान करून त्यांच्या शौर्यपूर्ण सेवेला मानवंदना अर्पण करण्यात आली. कारगिल युद्धात भारतीय जवानांनी दाखविलेल्या अद्वितीय शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठेचे स्मरण करून शहीद वीरांना विनम्र अभिवादन करण्यात आले. देशाच्या सीमांचे रक्षण करताना सैनिकांनी दिलेले सर्वोच्च बलिदान हे प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी असून, राष्ट्र त्यांच्या ऋणात सदैव राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. सन्मानपत्राद्वारे नाईक सुभाषचंद्र परब यांच्या राष्ट्रसेवेचा, कर्तव्यपरायणतेचा आणि समर्पणाचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, नितीन परब, नितीन चव्हाण , आनंद परब , सुर्यकांत परब, वसंत परब , शैलेश जामदार, राजू जळवी आदी उपस्थित होते.
