“श्रीगणेशा आरोग्याचा” अंतर्गत गाडीअड्डा येथील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिरात सुमारे ८६ जणांची तपासणी करून औषधे देण्यात आली. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या सौजन्याने गणेश चतुर्थीच्या निमित्ताने “श्रीगणेशा आरोग्याचा” हे आरोग्य अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र वेंगुर्ला, वेंगुर्ला नगरपरिषद आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गाडीअड्डा यांच्या संयुक्त विद्यमाने १७ सप्टेंबर रोजी गाडीअड्डा गणेशोत्सवाच्या ठिकाणी येणाऱ्या भक्तांची विनामूल्य आरोग्य तपासणी करण्यात आली. यात ६३ पुरुष, १८ महिला आणि ५ बालके यांचा समावेश होता. या सर्वांना तपासणीअंती औषधे देण्यात आली. तसेच या शिबिरात १५ जणांची रक्त तपासणी, १० जणांचा ईसीजी आणि १३ आयुष्मान कार्ड काढण्यात आले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र लिलके, नगरसेवक गौरी माईणकर, गौरी मराठे, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, डॉ. संजिवनी लंबे, डॉ.सोनम, डॉ.मुंडे, डॉ.सुप्रिया रावळ, अधिपरिचारिका अश्विनी किनळेकर, प्राजक्ता मोरजकर, फार्मासिस्ट तनुश्री नाईक, आरोग्य सेवक उदय गावडे, काशीराम ठाकूर, लॅब टेक्निशियन मिताली पानकर, मदतनीस सेजल गावडे, सहाय्यक नितीन जाधव, आयुष्मान कार्डचे श्री.गवंडे, तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गाडीअड्डाचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
