वेंगुर्ल्यात राजमाता जिजाऊ बसेसचा लोकार्पण संपन्न

वेंगुर्ला तालुक्यातील तळागाळातील ग्रामीण भागातील प्रवासी वर्गाला दर्जेदार प्रवासी सेवा मिळावी या उद्देशाने सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यातून वेंगुर्ला आगारास पाच राजमाता जिजाऊ बसेस प्राप्त झाल्या होत्या. या बसेसचा लोकार्पण सोहळा १९ सप्टेंबर रोजी आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते बसेसचे पूजन करून व पुष्पहार घालून करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, उपसभापती सचिन देसाई, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, वेंगुर्ला आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे, तालुकाध्यक्ष पप्पू परब, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, शिवसेनेचे तालुका प्रमुख बाळा दळवी, शहर प्रमुख अजित राऊळ, शिवसेनेचे युवक जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, कोचरा सरपंच योगेश तेली, माजी सभापती सुनील मोरजकर, सत्यवान साटेलकर, मितेश परब, दत्ता साळगावकर, कौशिक मोरजे, संजय परब, मनीष रेवणकर, संतोष परब, उमेश नाईक, अशोक वेंगुर्लेकर,  गणपत केळुसकर, प्रकाश मोठे, पंकज शिरसाट, नगरसेवक लिना म्हापणकर, समिधा रेडकर तसेच वेंगुर्ला आगारातील अधिकारी, कर्मचारी व प्रवासी उपस्थित होते.

Leave a Reply