श्रीगणेशा आरोग्याचा अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या सौजन्याने गणेश चतुर्थीच्या निमित्ताने “श्रीगणेशा आरोग्याचा” हे आरोग्य अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र वेंगुर्ला, वेंगुर्ला नगरपरिषद आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गाडीअड्डा यांच्या संयुक्त विद्यमाने १७ सप्टेंबर रोजी गाडीअड्डा गणेशोत्सवाच्या ठिकाणी आलेल्या भक्तांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधे देण्यात आली. तर आयुष्मान कार्डही काढण्यात आले. उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रविंद्र लिलके, नगरसेवक गौरी माईणकर, गौरी मराठे, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, डॉ. संजिवनी लंबे, डॉ.सोनम, डॉ.मुंडे, डॉ.सुप्रिया रावळ, अधिपरिचारिका अश्विनी किनळेकर, प्राजक्ता मोरजकर, फार्मासिस्ट तनुश्री नाईक, आरोग्य सेवक उदय गावडे, काशिराम ठाकूर, लॅब टेक्निशियन मिताली पानकर, मदतनीस सेजल गावडे, सहाय्यक नितीन जाधव, श्री.गवंडे तसेच गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply