एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प वेंगुर्ला यांचे मार्फत साई डिलक्स हॉल येथे ९ वा राष्ट्रीय पोषण माह साजरा करण्यात आला. सन २०२५ च्या संकल्पनेनुसार “आमची अंगणवाडी आमची जबाबदारी” या मुद्द्यावर रचलेली आहे. या अभियानात ०.५ मूल्य पोषणावर आधारित आहेत. या कार्यक्रमांमध्ये सेविकांनी टाकाऊतून टिकाऊ, THR पाकिटामधून लाभार्थ्यांना दिलेल्या पाककृती पौष्टिक पदार्थ कडधान्यापासून दागिने बनविणे इत्यादी साहित्याचे प्रदर्शन या ठिकाणी लावण्यात आले होते. त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांचे पोषण आहारावर आधारित नाटिका, फुगडी असे विविध गुणदर्शनपर कार्यक्रम संपन्न झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुलं कुपोषित राहू नयेत यासाठी जि.प.च्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचा पुरेपूर लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोचवा आपला हा उत्कृष्ट असा उपक्रम पाहता जि.प. नेहमी आपल्या पाठिशी उभी राहील असे आश्वासन जि.प.चे शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी दिले. तर उपस्थित मान्यवरांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कामाचे कौतुक करून त्यांना काम करताना कोणत्याही समस्या
निर्माण झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पाठिशी नियमित उभे राहून असे आश्वासन दिले.
अंगणवाडी सेविकांनी लावलेल्या प्रदर्शनातील शेतीची अवजारे विशेष लक्षणीय ठरली. परुळे, चिपी येतील अंगणवाडी सेविकांनी केलेल्या शेती अवजारांचे पं.स.चे सभापती शंकर घारे यांच्यासह मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
यावेळी जि. प. सदस्य विजय नाईक, संजय गावडे, सुजाता पडवळ, पं.स.सदस्य नितीन मांजरेकर, गटविकास अधिकारी नाईक, आसोली सरपंच बाळा जाधव, बाल विकास प्रकल्प अधिकारी मोरे, पर्यवेक्षिका सामंत, परब, सहाय्यक संरक्षण अधिकारी अक्षय कानविंदे, तालुका समन्वयक निशांत, तसेच सर्व वेंगुर्ला प्रकल्पातील अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.
