तुळस येथे वन्यप्राण्यांसाठी पाण्याचा आधार

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार व पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली, विशाल परब व तुळस ग्रा.पं.च्या सहकार्याने वेताळ प्रतिष्ठानच्या पुढाकारातून श्री गोवर्धन मंदिर परिसरात वनराई बंधारा उभारण्यात आला. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा साठा करण्यासोबतच भूजल पुनर्भरणास चालना मिळणार असून, परिसरातील वन्यप्राणी व पाळीव जनावरांसाठी पाण्याचा आधार निर्माण होणार आहे. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, पं.स.सभापती शंकर घारे,  उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, जि.प.सदस्या सुजाता पडवळ, तुळस सरपंच रश्मी परब, उपसरपंच नारायण कुंभार, सदस्य जयवंत तुळसकर, सचिन नाईक, चरित्रा परब, रतन कबरे व शिक्षक बबन घोडे पाटील उपस्थित होते. वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सचिन वासुदेव परुळकर, सचिव विवेक तिरोडकर, नाना राऊळ, महेश राऊळ, माधव तुळसकर, यशवंत राऊळ, निलेश राऊळ, रोहन राऊळ, सचिन राऊळ,प्रसाद भणगे, नाना सावळ, प्रदीप सावंत, संदीप गावडे, सदगुरू सावंत, सुधीर चुडजी, मंगेश सावंत, सुहास सावंत, सागर सावंत, प्रदीप परुळकर, प्रज्वल परुळकर, प्रमोद तांबोसकर, आनंद राऊळ, रोहित गडेकर, भूमी परुळकर व भार्गवी परुळकर तसेच उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथील रावे ग्रुपचे ओम कुंभार, अरिन मोंडे, धनंजय साळवी, सिद्धार्थ चौधरी, यशराज पाटील, अमित टोकसिया व दिनेश बिश्नोई यांनी श्रमदान केले.

Leave a Reply