शहरातील वेंगुर्ला नं.4 या शाळेच्या प्रशस्त सभागृहासाठी सिलिंग फॅनची गरज होती. शाळेची ही गरज लक्षात घेऊन शाळेच्या व्यवस्थापन समिती सदस्य तथा वेंगुर्ला नगरपरिषदेच्या नगरसेविका आकांक्षा परब यांनी 5 सिलिंग फॅन भेट म्हणून दिल्या. गुरूवार 8 ऑक्टोबर रोजी मुख्याध्यापक संतोष परब यांच्याकडे फॅन सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अजित राऊळ, उपाध्यक्ष हर्षद परब, सदस्य आकांक्षा परब, मेघना राऊळ, शिक्षिका सानिका कदम, अंगणवाडीच्या नयना आरेकर, पोषण आहाराच्या श्रद्धा वेंगुर्लेकर यांच्यासह पालक व विद्यार्थी उपस्थित होते. नगरसेवक परब यांच्या या सहकार्याबद्दल शाळेतर्फे त्यांची आभार मानण्यात आले.नगरसेविका आकांक्षा परब यांच्याकडून शाळेला सिलिंग फॅन भेट
शहरातील वेंगुर्ला नं.4 या शाळेच्या प्रशस्त सभागृहासाठी सिलिंग फॅनची गरज होती. शाळेची ही गरज लक्षात घेऊन शाळेच्या व्यवस्थापन समिती सदस्य तथा वेंगुर्ला नगरपरिषदेच्या नगरसेविका आकांक्षा परब यांनी 5 सिलिंग फॅन भेट म्हणून दिल्या. गुरूवार 8 ऑक्टोबर रोजी मुख्याध्यापक संतोष परब यांच्याकडे फॅन सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अजित राऊळ, उपाध्यक्ष हर्षद परब, सदस्य आकांक्षा परब, मेघना राऊळ, शिक्षिका सानिका कदम, अंगणवाडीच्या नयना आरेकर, पोषण आहाराच्या श्रद्धा वेंगुर्लेकर यांच्यासह पालक व विद्यार्थी उपस्थित होते. नगरसेवक परब यांच्या या सहकार्याबद्दल शाळेतर्फे त्यांची आभार मानण्यात आले.