बक्षिसाच्या रक्कमेतून संविता आश्रमाला मदत

राऊळवाडा येथील जबरदस्त सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळाने आपल्याला मिळालेल्या नरकासूर स्पर्धेच्या पारितोषिकाच्या रक्कमेतून जीवनावश्यक वस्तू खरेदी करीत त्या पणदूर येथील संविता आश्रमाला प्रदान केल्या. या स्तुत्य उपक्रमाबद्दल मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, गेल्यावर्षी सुद्धा या मंडळाच्या नरकासूराला द्वितीय क्रमांकाचे बक्षिस मिळाले होते. त्या रक्कमेतून पिंगुळी-माड्याचीवाडी येथील जिव्हाळा सेवाश्रमाला जीवनावश्यक वस्तू प्रदान केल्या होत्या.

Leave a Reply