
वेंगुर्ला शहरात सध्या दररोज पहाटेच्यावेळी होत सुरू असलेल्या काकड आरतीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून प्रति दिवशी शेकडो भाविक या काकड आरतीचा लाभ घेत आहेत. दरम्यान, या काकड आरतीमुळे पहाटेच्यावेळी शहरात मंगलमय वातावरण निर्माण होत आहे.
अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून वेंगुर्ला शहरातील दाभोसवाडा, भुजनाकवाडी आणि माणिकचौक येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात काकड आरतीला प्रारंभ झाला आहे. पहाटेच्यावेळी होणाऱ्या या काकड आरतीला भाविकांची मोठी उपस्थिती लाभत आहे. रूपक, काकडा, भजन, प्रदक्षिणा, आरती अशा स्वरूपात ही काकड आरती पार पडत आहे. पहाटेला शांत वातावरणात होणाऱ्या या काकड आरतीमुळे शहरात मंगलमय वातावरण पहायला मिळत आहे. या काकड आरतीचा आनंद लुटण्यासाठी दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे. त्रिपुरारी पौर्णिमेला या काकड आरतीची सांगता होणार आहे.
