निबंध स्पर्धेत प्रणाली बर्डे प्रथम

भंडारी समाजाचा इतिहास लेखनातून उजेडात आणण्यासह मराठी साहित्याची अभिरूची वाढविणे आणि नवोदित लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्ला यांच्यावतीने राज्यस्तरीय खुली निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली. यात राज्याच्या विविध भागांतून एकूण २६ निबंध प्राप्त झाले. स्पर्धेत प्रथम-प्रणाली बर्डे (बेळगाव), द्वितीय-परीक्षित दाभोलकर (दापोली), तृतीय-दिलीप वायंगणकर (मुंबई), उत्तेजनार्थ -वैशाली माळी (कोल्हापूर), स्वरा राऊळ (सावंतवाडी) यांनी पटकावला. स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ साहित्यिका तथा महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या सदस्या वृंदा कांबळी आणि प्रा.डॉ.सचिन परुळकर यांनी केले. सर्व विजेत्यांचे मंडळाचे अध्यक्ष डॉ.आनंद बांदेकर तसेच पदाधिकारी व संचालक मंडळानेही अभिनंदन केले.

Leave a Reply