बाळकृष्ण मसगे यांना उत्साद बिस्मिल्ला खान राष्ट्रीय पुरस्कार

ठाकर आदिवासी समाजाच्या पारंपरिक कळसुत्री बाहुल्या, चित्रकथी आणि अन्य दुर्मिळ लोककलांचे जतन, संवर्धन व पुनरूज्जीवन करण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणारे युवा अकादमी, नवी दिल्ली यांच्यावतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा “उत्साद बिस्मिल्ला खान राष्ट्रीय युवा पुरस्कार २०२४” जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे या सन्मान कोणत्याही शिफारशीशिवाय केवळ कलकाराच्या कलेतील योगदानाच्या आधारे दिला जातो. मुंबईतील सर जे.जे.स्कूल ऑफ आर्टमधून कला पदवी घेतल्यानंतर बाळकृष्ण मसगे यांनी चित्रपटसृष्टीत “आर्ट डायरेक्टर” म्हणून काम केले. त्यांनी लोप पावत चाललेल्या ठाकर आदिवासी लोककलांना आधुनिक सादरीकरणाची जोड देत नवसंजीवनी दिली आहे. तसेच ज्येष्ठ लोककलावंत गणपत मसगे यांच्या सहकार्याने ठाकरवाडी आदिवासी म्युझियमच्या उभारणीतही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या पुरस्कारामुळे सिंधुदुर्गसह संपूर्ण ठाकर आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक कार्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे.

Leave a Reply