डॉ. प्रणाली येरम हिची फार्मास्युटिकल सायन्सेस विषयात पीएच.डी.

वेंगुर्ल्याची कन्या डॉ. प्रणाली बुधाजी येरम हिने शोभाभेन प्रतापभाई पटेल स्कूल ऑफ फार्मसी अॅण्ड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट, नवी मुंबई येथून फार्मास्युटिकल सायन्सेस या विषयात पीएच.डी.पदवी संपादन केली आहे. या शिक्षणादरम्यान तिला विद्यापिठाची प्रतिष्ठित डॉक्टोरल फेलोशिप प्राप्त झाली होती. यासाठीचे तिचे संशोधन हे “क्रॉनिक किडनी डिजीस” यावर आधारीत असून उच्च प्रभावांक असलेल्या आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकांमध्ये तिचे लेख प्रकाशित झाले आहेत. या यशामुळे तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
           डॉ.प्रणाली हिने असोसिएट प्राध्यापक डॉ.अमिशा वोरा व असोसिएट डीन व प्राध्यापक डॉ.योगेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. यापूर्वी तिने रत्नागिरी येथील गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसीमधून बी.फॉर्मसी पदवी, जीपॅट परीक्षेत यश, मुंबई येथील प्रि.के.एम.कुंदानी कॉलेज ऑफ फार्मसीमधून एम.फार्मसी पदवी प्राप्त केली. एम.फार्मसीचे शिक्षण हे तिने फेलोशिपच्या माध्यमातून पूर्ण केले. सध्या डॉ.प्रणाली ही नवी मुंबई येथील शोभाभेन प्रतापभाई पटेल स्कूल ऑफ फार्मसी अॅण्ड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंटमध्ये साहाय्यक प्राध्यापक असून अध्यापन, संशोधन आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी मोलाचे योगदान देत आहे. कु. प्रणाली ही वेंगुर्ला येथील माजी नगरसेवक बुधाजी उर्फ उमेश येरम यांची कन्या होय.

Leave a Reply