वेंगुर्ला येथील रहिवासी व न्यायालयातील कर्मचारी सौ.चारुता विलास दळवी यांची जिल्हा न्यायालयाच्या प्रबंधकपदी नियुक्ती झाली असून अलिकडेच त्यांनी त्याचा पदभार स्विकारला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन १५ एप्रिल १९८५ रोजी मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्या अधिपत्याखाली बांद्रा न्यायालयात प्रथम नियुक्ती मिळाली होती. त्यानंतर त्या बदली होऊन सिधुदुर्गात ओरोस, वेंगुर्ला, सावंतवाडी न्यायलायात कार्यरत होत्या. नवनिर्मित दोडामार्ग न्यायलायाच्या पहिल्या सहाय्यक अधिक्षक म्हणून त्यांनी ४ वर्षे काम केले. बढती मिळाल्यावर दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, ओरोस सिधुदुर्ग येथे अधिक्षक म्हणून काम पाहिले आहे.

हार्दिक अभिनंदन