विविध मैदानी स्पर्धेत आर्या पाटील हिचे यश

क्रीडा व युवक सेवा संचालनालयमहाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयसिधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धेत वेंगुर्ला हायस्कूलमधील इयत्ता आठवीतील विद्यार्थीनी आर्या संदिप पाटील हिने विविध मैदानी स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन केले आहे.

      कु. आया हिने २०० मीटर धावणे प्रकारात प्रथम क्रमांक८० मीटर हर्डल्समध्ये तृतीय क्रमांक तर १०० मीटर धावणेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तिच्या या यशाबद्दल वेंगुर्ला हायस्कूलचे मुख्याध्यापकशिक्षकशिक्षकेत्तर कर्मचारीविद्यार्थी व पालक यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply