शिवराज्याभिषेक दिनी भाजपातर्फे शिवाजी महाराजांना अभिवादन

शिवराज्याभिषेक दिनाला ३५० वर्षे झाल्याबद्दल वेंगुर्ला भाजपातर्फे माणिकचौक येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी  प्रसन्ना देसाई, दिलीप गिरप, वसंत तांडेल, साईप्रसाद नाईक, सुरेंद्र चव्हाण, प्रशांत खानोलकर, बाळू प्रभू, संदिप पाटील, पिटू गावडे, शामसुंदर मुणनकर, पपू परब, रविद्र शिरसाठ, पुंडलिक हळदणकर, नितिश कुडतरकर, सूर्यकांत परब, ओंकार चव्हाण, दिलीप मालवणकर आदी उपस्थित होते. यावर्षीच्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याला शासनाकडून निधी उपलब्ध झाल्याने हा सोहळा भव्यदिव्य स्वरुपात साजरा केला जाणार आहे.

Leave a Reply