आयुष्यमान वय वंदना योजनेचे मोफत फॉर्म वाटप

वेंगुर्ला भाजपा कार्यालयात ७० वर्षावरील नागरिकांना ‘आयुष्यमान वय वंदना‘ योजनेचे मोफत फॉर्म वाटप भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. आयुष्यमान भारत योजनेत बदल केला असून आता ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या प्रत्येक नागरिकाला आयुष्यमान वय वंदना या योजनेत समाविष्ट करून घेण्यात आले आहे. त्यामुळे सुमारे ६ कोटी वृद्धांना उपचाराची सुविधा मिळू लागली असल्याची माहिती प्रसन्ना देसाई यांनी दिली. यावेळी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ७० वर्षांवरील स्त्री व पुरुष उपस्थित होते.

Leave a Reply